Breaking; मुलाने केला वडिलांचा खून; करमाळा तालुक्यातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:32 PM2021-09-03T16:32:22+5:302021-09-03T16:32:32+5:30

वेड्याच्या भरात मुलाने केले कृत्य; करमाळा पोलिसात घटनेची नोंद

Breaking; Son commits murder of father; Shocking incident in Karmala taluka | Breaking; मुलाने केला वडिलांचा खून; करमाळा तालुक्यातील धक्कादायक घटना

Breaking; मुलाने केला वडिलांचा खून; करमाळा तालुक्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

 

करमाळाजिंती (ता.करमाळा) येथे एकुलत्या एका मुलाने वेड्याच्याभरात वृद्ध पित्यास बेदम मारहाण केली त्यात पित्याचा मृत्यू झाला आहे.  

 जिंती येथील राजाराम मारुती जगताप (वय-75) यांना अंकुश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. गेल्या काही वर्षापासून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्याला काही दिवस मनोरूग्णालयात दाखल केले होते. पण तो पूर्ण बरा झाला नव्हता. तो दारू पिऊन दिवसभर रेल्वे गेट ते गावात चकरा मारत असे. एक वर्षापासून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. 

गुरूवार (ता.2) रात्री अंकुशने दारू पिऊन वेडाच्या भरात वडील बेशुद्ध पडेपर्यंत मारले. आज शुक्रवार सकाळी ही हकिकत  येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना समजताच त्यांनी राजाराम जगताप यांना वाहन करून उपचारासाठी करमाळा येथे पाठविले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांना ही हकीकत समताच तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील  कुटीर रूग्णालयात पाठविला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: Breaking; Son commits murder of father; Shocking incident in Karmala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.