Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:31 PM2022-01-19T12:31:45+5:302022-01-19T12:32:26+5:30

भाजपाच्या  दोन जोड्या झाल्या नगरसेवक

Breaking; BJP has a clear majority in the Malshiras Nagar Panchayat election results | Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत 

Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत 

googlenewsNext

एल. डी. वाघमोडे

 

लोकमत न्यूज नेटवर्क

माळशिरस नगरपंचायतीच्या  एक जागा बिनविरोध झाली होती उर्वरित १६ जागांसाठी झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले असून नव्याने महाराष्ट्र विकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी यश मिळवले. असून राष्ट्रवादीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर तीन अपक्षांनी निकालात बाजी मारल्याचे चित्र आज स्पष्ट झाले.

नगरपंचायतीच्या निकालात प्रथमत भारतीय जनता पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी अर्चना देशमुख तर माजी नगरसेविका शोभा धाईंजे या पुन्हा नव्याने तर त्यांचे पती आबा धाईंजे  नगरसेवक पदासाठी निवडून आले असल्याने पती-पत्नीच्या दोन जोड्या यंदा नगरसेवक झाल्या आहेत.


माळशिरस नगरपंचायत निकाल

विजयी उमेदवार ....

प्रभाग १ - कैलास वामन ( म.वि.आ  ) प्रभाग २- ताई वावरे ( अपक्ष ) बिनविरोध प्रभाग ३ -पुनम वळकुंदे ( अपक्ष ) प्रभाग ४- विजय देशमुख ( भाजप ) प्रभाग ५ -शोभा धाईजे ( भाजप ) प्रभाग ६ - आबा धाईंजे ( भाजप ) प्रभाग ७- आप्पासाहेब  देशमुख ( भाजप ) प्रभाग ८ - कोमल जानकर ( भाजप ) प्रभाग ९ -राणी शिंदे ( भाजप ) प्रभाग १०- अर्चना देशमुख ( भाजपा )प्रभाग ११ रेष्मा टेळे ( म.वि.आ  ) प्रभाग १२-प्राजक्ता ओवाळ ( भाजप ) प्रभाग १३ -शिवाजी देशमुख ( राष्ट्रवादी ) प्रभाग १४- मंगल गेजगे ( अपक्ष ) प्रभाग १५- मंगल केमकर ( भाजप ) प्रभाग १६ पुष्पावती कोळेकर ( भाजप ) प्रभाग १७ रघुनाथ चव्हाण ( राष्ट्रवादी ) भाजपा - १० राष्ट्रवादी - २ मा वि आ .२ अपक्ष - ३

Web Title: Breaking; BJP has a clear majority in the Malshiras Nagar Panchayat election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.