मोठी बातमी; ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय सोलापूरकरांना आता मिळणार नाही कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:06 PM2021-04-10T18:06:54+5:302021-04-10T18:07:21+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Solapur residents will no longer get the corona vaccine without registering online | मोठी बातमी; ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय सोलापूरकरांना आता मिळणार नाही कोरोना लस

मोठी बातमी; ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय सोलापूरकरांना आता मिळणार नाही कोरोना लस

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये एकूण महापालिकेच्या १५ नागरिक आरोग्य केंद्रात व १३ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोविड लस (व्हॅक्सिनेशन )देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होते. कोविड लस घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून ऑफलाईन रजिस्ट्रेशन व ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन सुरु केले होते. पण यामुळे आरोग्य केंद्रावरती नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उद्यापासून ऑफलाईन रजिस्ट्रेशन व ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन बंद करण्यात येत असून ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यांनाच उद्यापासून लस देण्यात येईल तसेच दररोज १५० नागरिकांना संबंधीत आरोग्य केंद्रामध्ये त्यांना दिलेल्या वेळेत लसीकरण करणेबाबत आदेश देण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून covid.gov.in या वेबसाईटर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व दिलेल्या वेबसाईटर योग्य ती आपली माहिती अपलोड करुन आपल्या जवळच्या आरोग्य सेंटरची निवड करुन रजिस्ट्रेशन करु शकता. तसेच या लसीकरण मोहिमेसाठी मुळे हॉस्पिटल व नर्सिंग हॉस्पिटलकडून २४ विद्यार्थ्यांना घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यासाठी मदत होईल.

शहरातील नागरिकांना विनंती करणेत येते की, त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन लसीकरणाचा लाभा घ्यावा. तसेच शहरातील एनजीओ व सामाजिक संस्थेना विनंती आहे की त्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना ऑनलाईन लसीकरणासाठी मदत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले.

Web Title: Big news; Solapur residents will no longer get the corona vaccine without registering online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.