मोठी बातमी; काम करणाऱ्या सोलापुरातील ८०० एसटी कर्मचाऱ्यांचाच होणार पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:05 PM2021-12-08T19:05:39+5:302021-12-08T19:05:50+5:30

सतराशे कर्मचारी कामावर आज परतणार

Big news; The salary of 800 ST employees working in Solapur will be the same | मोठी बातमी; काम करणाऱ्या सोलापुरातील ८०० एसटी कर्मचाऱ्यांचाच होणार पगार

मोठी बातमी; काम करणाऱ्या सोलापुरातील ८०० एसटी कर्मचाऱ्यांचाच होणार पगार

Next

सोलापूर : विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पगारवाढ केल्यानंतरदेखील काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल ८०० कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यानुसार सोलापुरातील काम करणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांचाच पगार जमा होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ३९०० एसटी कर्मचारी असून, त्यातील १७०० सतराशे कर्मचारी आजपासून कामावर परतणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे.

---

  • जिल्ह्यातील एकूण कर्मचारी - ३९००
  • कामावर हजर झालेले कर्मचारी - ८००
  • सध्या संपात सहभागी कर्मचारी - ३०००

---

 

दिवसभरात ४५ फेऱ्या बार्शीमधून शिवशाहीची एक बस परीने येथे सोडण्यात आली. याशिवाय सोलापूर विभागातून काम करणाऱ्या आठशे कर्मचाऱ्यांमार्फत सोमवारी दिवसभरात एसटीच्या ४५ फेऱ्या झालेल्या आहेत.

 

३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, वेतनवाढ करावी, वेतन वेळेत द्यावे, महागाई भत्ता वाढवावा, अशा अनेक मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. यातील वेतनवाढीच्या मागणीसह अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही एसटी कर्मचारी हे विलीनीकरणासाठी संपात सहभागी आहेत, अशा ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

१५० जणांची बदली

महामंडळाने पगारवाढ केल्यानंतरही संप सुरूच ठेवला, अशा एसटी कर्मचाऱ्यांविरोधात व सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अडथळा करणाऱ्या १५० जणांची बदली केली आहे.

८०० कर्मचाऱ्यांचाच पगार

वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल ८०० कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवेत काम करणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांचाच पगार जमा होत आहे.

 

अनेक कर्मचारी कामावर रुजू होत आहेत, आज सकाळीच किमान सतराशे ते अठराशे एसटी कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत. जो कारभारी कामावर रुजू होईल त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे.

-विलास राठोड, विभाग नियंत्रक

 

----

Web Title: Big news; The salary of 800 ST employees working in Solapur will be the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.