मोठी बातमी; नगरसेवकाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अवैध गॅस व्यवसायावर टाकली धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 03:01 PM2021-07-07T15:01:58+5:302021-07-07T15:02:54+5:30

गुन्हे शाखेची कामगिरी : ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Big news; Raid on illegal gas business run with the blessings of the corporator | मोठी बातमी; नगरसेवकाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अवैध गॅस व्यवसायावर टाकली धाड

मोठी बातमी; नगरसेवकाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अवैध गॅस व्यवसायावर टाकली धाड

Next

सोलापूर : रेल्वे विभागाच्या वसाहतीमधील वरद विनायक स्टेशनचा राजा या गणपती मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेल्या खोलीमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. हा व्यवसाय नगरसेवकाच्या संगनमताने चालत असल्याचे पुढे आले असून संबंधित व्यक्तीकडून ४२ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नगरसेवक मनोज शेजवाळ (रा. रेल्वे लाईन), योगेश पांढरे, गणेश शिवाजी पांढरे, (दोघे रा. बुधवार पेठ) व अन्य एक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वरद विनायक स्टेशनचा राजा या गणपती मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेल्या खोलीमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस टाक्यांचा साठा असून तो रिक्षा व अन्य वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली असता, तेथे चिंचेच्या झाडाखाली गणेश पांढरे मिळून आला. तेथे इलेक्ट्रीक वजनकाटा, इंण्डेन कंपनीची लाल रंगाच्या ३७ गॅस टाक्या, एक प्लास्टिकचा पाईप एक इलेक्ट्रीक मोटार आढळली. तेेथे गणपती मंदिराच्या खोलीतून एक्सटेंन्शन बॉक्सद्वारे इलेक्ट्रीक कनेक्शन घेण्यात आले होते. चौकशी केली असता गणेश पांढरे याने नगरसेवक मनोज शेजवाळ व योगेश पांढरे करत आहेत. व्यवसायासाठी लागणारे घरगुती गॅस सिलिंडर टाकी शिवाजी थिटे हा पुरवत असल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, संजय क्षीरसागर, निखिल पवार, सहायक फौजदार सुहास आखाडे, हवालदार औदुंबर आटोळे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम देशमुख, विनायक बर्डे, स्वप्निल कसगावडे, राजू मुदगल, दत्तात्रय कोळेकर, शीतल शिवशरण, प्रवीण मोरे, नीलेश शिरूर, रणजितसिंह परिहार, चालक नेताजी गुंड यांनी पार पाडली.

बेकायदा वीजपुरवठा

० पोलिसांनी दोन इलेक्ट्रीक मोटार, एक इलेक्ट्रीक वजनकाटा, एक पांढऱ्या रंगाचा इक्सटेंन्शन बोर्ड, ३८ गॅस टाक्या असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गॅस सिलिंडर जीवनावश्यक वस्तूंमधील असताना त्याचा तुटवडा होईल, या उद्देशाने साठा केला तसेच बेकायदेशीररित्या चोरून विद्युत पुरवठा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Big news; Raid on illegal gas business run with the blessings of the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.