मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 09:54 AM2021-01-20T09:54:21+5:302021-01-20T09:54:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Online pass condition for darshan of Vitthal in Pandharpur canceled | मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची अट रद्द

मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची अट रद्द

googlenewsNext

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करून येणाऱ्या भविकांनाच विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन प्राप्त होईल अशी अट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ठेवली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑनलाइन दर्शन पास बुकिंगची अट मंदिर समितीने रद्द केली आहे.

२० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळेल. मात्र कोरानाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे.  लहान मुले, ६५ वर्षापुढील लोक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर भाविकांना ओळख पत्राची आवश्कता असणार आहे. तसेच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग देखील कारण्यात येणार आहे. यामुळे  भाविक त्यांच्या वेळेनुसार ऑन लाईन दर्शन पास बुकिंग करून दर्शनासाठी येऊ शकतात. दर्शन पासवर असलेल्या वेळी त्यांना दर्शन घडवले जाईल असे यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Web Title: Big news; Online pass condition for darshan of Vitthal in Pandharpur canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.