मोठी बातमी; हुतात्मा, पनवेल-नांदेड, विशाखापट्टणम एक्सप्रेस गाड्या ३१ मेपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:01 PM2021-04-08T17:01:27+5:302021-04-08T17:02:17+5:30

रेल्वे प्रशासन : दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वेचा ब्लॉक

Big news; Hutatma, Panvel-Nandand, Visakhapatnam Express trains canceled till May 31 | मोठी बातमी; हुतात्मा, पनवेल-नांदेड, विशाखापट्टणम एक्सप्रेस गाड्या ३१ मेपर्यंत रद्द

मोठी बातमी; हुतात्मा, पनवेल-नांदेड, विशाखापट्टणम एक्सप्रेस गाड्या ३१ मेपर्यंत रद्द

Next

सोलापूर : सोलापूर विभागातील भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि दुहेरीकरणाच्या कार्यासाठी घेण्यात येणा‌ऱ्या इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य गाड्या ३१ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील काही वर्षांपासून दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भाळवणी ते भिगवणदरम्यान दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला असून, येत्या मे अखेरपर्यंत या भागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या सोलापूर रेल्वे स्टेशनाच्या परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. सोलापूर ते वाडीपर्यंत दुहेरीकरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, सोलापूर ते दौंडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे.

-------------------------------

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची नावे

  • - पुणे-सोलापूर विशेष एक्सप्रेस
  • - सोलापूर-पुणे विशेष एक्सप्रेस
  • - पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस
  • - नांदेड-पनवेल विशेष एक्स्प्रेस
  • - विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्सप्रेस
  • - लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टणम विशेष एक्सप्रेस.

Web Title: Big news; Hutatma, Panvel-Nandand, Visakhapatnam Express trains canceled till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.