मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 03:40 PM2020-11-27T15:40:37+5:302020-11-27T15:42:50+5:30

आठ कारखान्यांनीच कळवली साखर सहसंचालक कार्यालयास ‘एफआरपी’ची माहिती

Big news; The crushing season of 24 sugar factories in Solapur district has started at full capacity | मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू

Next

सोलापूर : जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. यापैकी केवळ आठ कारखान्यांनी एफआरपीची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली आहे. त्यामुळे इतर साखर कारखाने किती एफआरपी देणार हा प्रश्न आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी १९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या (१९-२०) उताऱ्यानुसार यावर्षीची एफआरपी ठरणार आहे. तर मागील वर्षी ज्या कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नव्हता त्यांना (१८-१९) च्या उताऱ्यानुसार एफआरपी द्यावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या २४ साखर कारखाने सुरू झाले आहेत. यापैकी केवळ आठ कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर उताऱ्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली आहे. ‘कोरोना’मुळे साखर कारखान्यांना मागील वर्षीचे लेखापरीक्षण करण्यास मुदतवाढ दिल्याने सर्व कारखान्यांची एफआरपीची माहिती आली नसल्याचे साखर सहसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले.

----------

आठ कारखान्यांनी एफआरपी

0 युटोपियन कारखान्याचा मागील वर्षीचा साखर उतारा ९.९१ टक्के इतका होता, त्यानुसार यावर्षी प्रतिटन २११६ रुपये ६५ पैसे एफआरपी मिळणार आहे. सासवड माळी शुगर कारखान्याचा मागील वर्षीचा उतारा १०.३८ टक्के पडल्याने प्रतिटन २२९१ रुपये, विठ्ठल कार्पोरेशनचा उतारा मागील वर्षी १०.०२ टक्के पडला होता. त्यामुळे यावर्षी एफआरपीनुसार प्रतिटन २१९८ रुपये १२ पैसे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटीलचा मागील वर्षीचा साखर उतारा १०.५९ टक्के पडला होता. यावर्षी २३२० रुपये ८ पैसे, जयहिंद कारखान्याचा मागील वर्षी ९.६८ टक्के उतारा पडल्याने यावर्षी प्रतिटन दोन हजार ५७ रुपये २७ पैसे इतकी रक्कम द्यावी लागेल, असे कारखान्यांनी कळविले आहे.

0 मकाई साखर कारखाना मागील वर्षी बंद होता. मात्र या कारखान्याने १८-१९ च्या साखर उताऱ्यानुसार २३२३ रुपये ८८ पैसे, तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे कारखाना मागील वर्षी बंद होता. त्यामुळे १८-१९ च्या उताऱ्यानुसार प्रतिटन २१८२ रुपये ६८ पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Web Title: Big news; The crushing season of 24 sugar factories in Solapur district has started at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.