मोठी बातमी; परराज्यातून सोलापुरात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे

By appasaheb.patil | Published: February 24, 2021 05:40 PM2021-02-24T17:40:36+5:302021-02-24T17:41:15+5:30

शाळा 7 मार्चपर्यंत राहणार बंद; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय

Big news; Corona negative certificate is mandatory for those coming to Solapur from abroad | मोठी बातमी; परराज्यातून सोलापुरात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे

मोठी बातमी; परराज्यातून सोलापुरात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे

Next

सोलापूर - सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्या २५ फेब्रुवारीपासून सोलापूर जिल्ह्यात इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना उद्यापासून (दि.25) कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही भरणे यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची आज नियोजन भवन येथे श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेण्यात आली. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, सोलापूरकरांनी कोरोना लढ्यात साथ दिल्याने कोरोनाचे संकट परतवून लावण्यास मदत झाली. पुन्हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रूग्ण वाढू लागले आहेत. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, मात्र नागरिकांनी शासकीय आणि आरोग्य नियमाचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे. काही कडक निर्बंध घालणे जरूरीचे आहे. सोलापूरकरांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवल्यास कोरोनाला अटकाव करू शकतो. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.     

Web Title: Big news; Corona negative certificate is mandatory for those coming to Solapur from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.