मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आमदारांची होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:51 AM2020-09-05T08:51:04+5:302020-09-05T08:54:59+5:30

रविवारी जिल्ह्यातील प्रयोगशाळा सुरू राहणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Big news; All MLAs in Solapur district will undergo corona test | मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आमदारांची होणार कोरोना चाचणी

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आमदारांची होणार कोरोना चाचणी

Next

सोलापूर : विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या  सोमवारी दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील आरटी- पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा रविवार ६ सप्टेंबरला सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

सर्व सदस्यांना शनिवारी आणि रविवारी त्यांच्या गावाजवळील शासनमान्य किंवा शासकीय प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचण्या करणे शक्य व्हावे, त्यांचे रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयोगशाळा सुरू ठेवण्याचे आदेश विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत. याबाबत सर्व सदस्यांनी जवळच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून घ्याव्यात.

ज्या प्रयोगशाळा सदस्यांची चाचणी केल्यानंतर रविवारी त्यांचा रिपोर्ट देवू शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर करायचा आहे, असेही आदेशात म्हटले आहे

Web Title: Big news; All MLAs in Solapur district will undergo corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.