मोठी बातमी; नातेवाईकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली तर डॉक्टरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 01:35 PM2021-04-14T13:35:44+5:302021-04-14T13:35:48+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Big news; Action against the doctor if he sees a letter of Remedesivir in the hands of relatives | मोठी बातमी; नातेवाईकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली तर डॉक्टरांवर कारवाई

मोठी बातमी; नातेवाईकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली तर डॉक्टरांवर कारवाई

Next

 सोलापूर -  रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयांमध्येच उपलब्ध होतील. ही औषधे नसतील तर रुग्णालयांनी नियंत्रण कक्षाकडे संपर्क करावा.  रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी लिहून हे औषध आणायला सांगू नये. शहरात बुधवारपासून एखादा नातेवाईक हातात रेमडेसिविरची चिठ्ठी घेऊन फिरताना दिसला तर त्याची चौकशी होईल. या प्रकरणात रुग्णालये व डॉक्टरांवर कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी मंगळवारी दिला. 

पांडे म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, पुरवठा याचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. तरीही अनेक लोक शहरात चिठ्ठी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. काही लोक जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेतही आले होते. एखाद्या रुग्णालयात इंजेक्शन नसतील तर त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील नियंत्रण कक्षाला संपर्क करावा. रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन इंजेक्शन आणायला सांगू नका. हे चिठ्ठी लिहून देणारे डॉक्टर आणि रुग्णालय यांच्यावर कडक कारवाई होईल, असा इशाराही पांडे यांनी दिला. 

 

आणखी पाच रुग्णालये अधिग्रहीत

कोरोनाबाधीत रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील आणखी पाच रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत. या रुग्णालयांमध्ये ३० जनरल बेड आणि ३२ ऑक्सीजन बेड उपलब्ध असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सांगितले. महापालिकेने यापूर्वी शहरातील ४० रुग्णालयातील बेडस् अधिग्रहीत केली आहेत. नव्याने नोबल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल (१५ जनरल बेड, १० ओटू बेड), जुनाडे नर्सिंग होम (५ जनरल बेड), सुवा नर्सिंग होम (४ जनरल बेड आणि ८ ओटू बेड), एसआय हॉस्पिटल (४ जनरल बेड, ६ ओटू बेड), निर्मला मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल (२ जनरल बेड, ८ ओटू बेड) असे बेड अधिग्रहीत केले आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण या रुग्णालयात उपचार घेऊ शकतील.

 

Web Title: Big news; Action against the doctor if he sees a letter of Remedesivir in the hands of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.