Bhausaheb went to eat tea and tea ..! | भाऊसाहेब गेले जेवायला अन् चहाला..!
भाऊसाहेब गेले जेवायला अन् चहाला..!

ठळक मुद्दे- सोलापुरातील शासकीय कार्यालयांचे दुपारी जेवणानंतरचे स्टिंग आॅपरेशन- अधिकारी व कर्मचाºयांकडून कामाच्या वेळा पाळल्या जात नसल्याचे आले दिसून- शासकीय कामासाठी येणाºया नागरिकांनी गैरसोय

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय आहे. जेवणासाठी दुपारी अर्ध्या तासाची सुटी असताना सुमारे दीड तास कर्मचारी कार्यालयाबाहेर असल्याचे दिसून आले. खुर्ची रिकामी दिसल्यानंतर नागरिकांनी शिपायाकडे संबंधित कर्मचाºयांची विचारणा केली असता भाऊसाहेब आताच जेवायला गेले.. आताच चहा प्यायला गेले.. असे उत्तर देण्यात येत आहे. 

राज्य शासनाने दुपारच्या जेवणासाठी शासकीय कर्मचाºयांना अर्धा तास वेळ निश्चित केला आहे. या वेळेशिवाय कर्मचाºयांनी कार्यालयाबाहेर जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. असे असतानाही या आदेशाची कोणतीच अंमलबजावणी तहसील कार्यालयातील कर्मचाºयांकडून होत नसल्याची माहिती येथे कामानिमित्त आलेले ज्येष्ठ नागरिक तुकाराम पाटील यांनी दिली.

अर्ध्या तासाची सुटी दीड तासावर गेली तरीही कर्मचारी आपल्या टेबलावर येत नसल्याने अनेक नागरिकांनी यावेळी रिकाम्या खुर्चीसमोरच उभे राहून त्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. तहसील कार्यालयातील कर्मचाºयांचा हा प्रकार नेहमीचाच असल्याची माहिती यावेळी नागरिकांकडून देण्यात आली. 

तहसील कार्यालयात तलाठी व मंडल अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. गावात नसलेला तलाठी या कक्षात तरी असेल या आशेने काही शेतकरी तहसील कार्यालयात आले होते. मात्र या कक्षातही भाऊसाहेब दिसत नसल्याने अनेक शेतकरी यावेळी तलाठी भाऊसाहेबांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून आले. 


Web Title: Bhausaheb went to eat tea and tea ..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.