Beraking; पांडुरंगाची भेट न घेता जाऊ माघारी; रघुनाथ महाराज गोसावींचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:06 PM2020-07-01T13:06:47+5:302020-07-01T13:09:55+5:30

मानाच्या पालखांच्या प्रमुखांची पंढरीत बैठक; श्री संतांच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्या... 

Beraking; Go back without visiting Panduranga; Raghunath Maharaj Gosavi's warning | Beraking; पांडुरंगाची भेट न घेता जाऊ माघारी; रघुनाथ महाराज गोसावींचा इशारा

Beraking; पांडुरंगाची भेट न घेता जाऊ माघारी; रघुनाथ महाराज गोसावींचा इशारा

Next
ठळक मुद्देआषाढी यात्रेसाठी सर्व नियम अटी पूर्ण करून आलेल्या प्रमुख पालख्यां पंढरपुरात आल्यादिलेल्या वेळे च्या २ जुलै रोजी माघारी प्रस्थान करण्याचा रेटा प्रशासना कडून सुरू करण्यात आला सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेळ मिळावी

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सर्व सूचनांचे पालन करत पंढरपूर येथे आलो आहे, मात्र श्री विठ्ठलाचे दर्शन फक्त ५ भाविकांना मिळणार आहे. जर पालखीसह आलेल्या सर्व २० वारकºयांना विठ्ठलाचे दर्शन घेऊ दिले नाही. तर पांडुरंगाची भेट न घेता माघारी जाऊ असा इशारा श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी प्रमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.

एक दिवस अगोदर माघारी परतण्याबाबत प्रशासनाकडून सूचना सर्व पालखी प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. यानंतर सर्व पालखी प्रमुखांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विकास ढगे पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख योगेश देसाई, निवृत्तीनाथ महाराज, संजयनाना धोंडगे, मुक्ताई संस्थानचे प्रमुख रवींद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.

आषाढी यात्रेसाठी सर्व नियम अटी पूर्ण करून आलेल्या प्रमुख पालख्यां पंढरपुरात आल्या आहेत. दिलेल्या वेळे च्या २ जुलै रोजी माघारी प्रस्थान करण्याचा रेटा प्रशासना कडून सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्व पालखी प्रमुखांनी श्री संतांच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्या. सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेळ मिळावी. अशी मागणी प्रशासनाकडे करण्याचे या बैठकीत ठरले आहे 

Web Title: Beraking; Go back without visiting Panduranga; Raghunath Maharaj Gosavi's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.