बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:30 AM2019-08-19T10:30:07+5:302019-08-19T10:32:30+5:30

सोलापुरात खास प्रशिक्षण मिळणार; ‘करा ओके’च्या माध्यमातून जोपासता येईल आवड

Bathroom Singer also sings in Sur-Tala! | बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात !

बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात !

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येकामध्ये एक गायक हा दडलेला असतो. त्यातील बहुतांश जणांचा आवाजही चांगला असतोफक्त गाण्याची संधी मिळत नाही तसेच धाडसही होत नाही. अशा बाथरुम सिंगरसाठी एक अनोखा उपक्रमगाण्याची आवड असणाºया हौशी कलाकारांसाठी आसरा चौक येथे प्रा. प्रशांत गोपाळे हे प्रशिक्षण देणार

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : प्रत्येकामध्ये एक गायक हा दडलेला असतो. त्यातील बहुतांश जणांचा आवाजही चांगला असतो. फक्त गाण्याची संधी मिळत नाही तसेच धाडसही होत नाही. अशा बाथरुम सिंगरसाठी एक अनोखा उपक्रम आपल्या सोलापुरात सुरू होतोय. गाण्याची आवड असणाºया हौशी कलाकारांसाठी आसरा चौक येथे प्रा. प्रशांत गोपाळे हे प्रशिक्षण देणार आहेत.

आपल्या कामाच्या व्यापातून अनेकांना गाण्याची आवड जोपासता येत नाही. संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी तितका वेळ द्यावा लागतो. संगीतामध्ये करिअर करावे अशी मानसिकता अजूनतरी आपल्यात आलेली नाही. यामुळे बºयाचदा आपल्या आवडीला मुरड घालावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना देखील गाण्याची आवड असते. अशाच मनापासून गाण्याची आवड असणाºयांना करा ओकेच्या माध्यमातून गीत म्हणण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

मला गाणं म्हणायला लहानपणापासूनच आवडत होते. वर्गातही मी गाणं म्हणायचो. शिक्षकही माझ्या गाण्याचे कौतुक करायचे. सातवीत असताना १५ आॅगस्टला शाळेच्या कार्यक्रमात गायची संधी मिळाली. वर्गात चांगलं गाणं म्हणणारा मी सर्वांसमोर मात्र घाबरुन गाणं व्यवस्थित म्हणू शकलो नाही. माझा आवाज कापत होता. कशीबशी मी वेळ मारुन नेली. या गोष्टीमुळे मला वाईट वाटले; मात्र यातून धडा घेतला असून आता गाण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असल्याचे प्रा. गोपाळे यांनी सांगितले. 

करा ओके म्हणजे काय ?
गाणे म्हणताना त्याला संगीताची जोड असते. मात्र प्रत्येक ठिकाणी वाद्यवृंद असतोच असे नाही. तशात वाद्यवृंदासोबत गाणं म्हणणे नवख्या गायकाला अवघड जातं. त्यांच्यासाठी करा ओके हा प्रकार फार फायदेशीर आहे. यात गाण्यामध्ये शब्दांऐवजी फक्त संगीत असते त्याला इन्स्ट्रुमेंटल असेही म्हणतात. त्या संगीतावर आपण गाणे म्हणू शकतो. अशी गीते म्हणण्यासाठी देखील थोड्याशा प्रशिक्षणाची गरज असते.

आपल्या आॅफिसमध्ये तसेच इतर ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. ज्यांना गाणे म्हणण्याची आवड आहे, तसेच त्यांचा आवाजही चांगला आहे. असे लोक कार्यक्रमात गाणं म्हणायला घाबरतात. आपण गाणं चुकलो तर लोक आपल्यावर हसतील यांची त्यांना भीती असते. असे अनेक कलाकार आपल्यामध्ये दडलेले असतात. अशा कलाकारांना त्यांची हौस भागवता यावी म्हणून आमचा छोटा प्रयत्न आहे.
- प्रा. प्रशांत गोपाळे, गायक

Web Title: Bathroom Singer also sings in Sur-Tala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.