दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:13 PM2019-10-24T16:13:30+5:302019-10-24T18:15:13+5:30

Barshi Vidhan Sabha Election Results 2019: शिवसेनेला धक्का; माजीमंत्री दिलीप सोपलांसह राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचा पराभव

Barshi Election Results 2019: Rajendr raut vs dilip sopal, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी

दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी

googlenewsNext
ठळक मुद्दे- बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का- माजी मंत्री दिलीप सोपलांचा झाला पराभव- भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र राऊत विजयी

सोलापूर : बार्शीविधानसभा मतदरसंघाच्या मतमोजणीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार माजीमंत्री दिलीप सोपल यांचा सुमारे २९०० मतांनी पराभव करुन १० वर्षानंतर पुन्हा आमदरकी मिळवली आहे. 

पहिल्या फेरीपासूनच राजेंद्र राऊत आघाडीवर होते. मात्र पाचव्या फेरीअखेर बार्शी शहराची मततोजणी सुरु झाल्याने ते पिछाडीवर गेले. एकंदरीत १० व्या फेरीअखेर सोपल हे पाच हजारपेक्षा जास्त मतांनी  पुढे होते. मात्र पुन्हा ग्रामीण भागााची मतमोजणी सुरु होताच प्रत्येक फेरीरिहाय ५०० ते १००० मतांनी आघाडी घेत इव्हीएम मशिनच्या मतमोजणीमध्ये २६५२ मतांनी राऊत हे विजयी झाले. राऊत राऊत यांचे चिन्ह ट्रक्टर होते आणि त्यांच्याशेजारी असलेले अपक्ष उमेदवार विशालकळसकर यांचे चिन्ह रोड रोलर होते. रोडरोलरला सुमारे १२ हजार मते मिळाली. चिन्हात साधर्म्य असल्याने राऊत यांचे मताधिक्य कमी झाले. 

राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विजय होताच बार्शी शहरात राऊत  गटाने फटक्याची आतषबाजी करुन विजयाचा जल्लोष साजरा केला. राऊत हे भोजन करीत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे राऊत यांचे अभिनंदन केले. 



 

Web Title: Barshi Election Results 2019: Rajendr raut vs dilip sopal, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.