पंधरा लाखाच्या चोरी प्रकरणातील एकास अटक; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 04:58 PM2021-01-06T16:58:01+5:302021-01-06T17:14:14+5:30

११ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत

Attal thief arrested for stealing Rs. Performance of Pandharpur Police | पंधरा लाखाच्या चोरी प्रकरणातील एकास अटक; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

पंधरा लाखाच्या चोरी प्रकरणातील एकास अटक; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

Next

पंढरपुर : पंढरपुरातील प्रतिष्ठीत उद्योगपती अजित फडे यांच्या घरातून १४ लाख ७५ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या राहुल हरिशचंद्र पवार ( वय २१, रा. महावीर नगर, पंढरपूर) या अट्टल चोरास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध उद्योगपती अजित फडे व  संजिवनी अजित फडे (वय ६०, रा. महावीर नगर, पंढरपूर) यांच्या घरात अज्ञात चोरटयाने नजर चुकवुन प्रवेश करून १४ लाख ७५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ०१ डिसेंबर २०२० रोजी ते १३ डिसेंबर २०२० दरम्यान पळवला. यामध्ये १२ लाख २५ हजार रुपये किंमतीचे अंदाजे ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १२,२५,००० रुपये किंमतीचे, २ लाख रुपये किंमतीचे ५ किलो ९० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, पितळ धातूच्या भांडी, ५०० रुपये किंमतीचा जुना बंद असलेला मोबाईल,  ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४ लाख ७५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आहे.  याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

तत्काळ त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर व कर्मचारी यांनी भेट दिली. त्यांनी  घटनास्थळ पाहिले असता त्या घराचे कुलूप अथवा घराची कडी तुटली नसल्याने घरामध्ये प्रवेश करणारा व्यक्ती हा ओळखीचा अथवा घरात येणारा जाणारा असल्याचे प्राथमिक अंदाज लावला. या प्रकरणी संशईत इसम राहुल हरिशचंद्र पवार ( वय २१, रा. महावीर नगर, पंढरपूर) यास ताब्यात घेवून प्रथमता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात चोरीस गेलेला मोबाईल मिळून आला. त्यास पोलीस ठाणेस आणून अधिक विश्वासात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला. त्यानंतर त्याने हा गुन्हा केला असल्याचे सांगितले.

त्याच्याकडून ९ लाख ८० हजार रुपये किंमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख ४० हजार रुपये किंमतीची ३ किलो ५०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, पितळ धातूच्या भांडी, व ५०० रुपये किंमतीचा  जुना बंद मोबाईल असा असलेला एकूण  ११ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. राहुल हरिशचंद्र पवार हा सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. 

ही कामगिरी ही पोलीस अधिक्षक  तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ. सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, पोना. गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, पोकॉ सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनिल बनसोडे, अन्चर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली. असून सदर गुन्हयाचा तपास अरुण पवार हे करत आहेत.

Web Title: Attal thief arrested for stealing Rs. Performance of Pandharpur Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.