समूह संघटकास रजेवर पाठविल्याने आशा वर्कर्स तूर्त मागे हटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:18+5:302021-06-11T04:16:18+5:30

दरम्यान, १० जूनला सकाळी ११ वाजता मात्र आंदोलनाच्या चौथ्या दिवशी यातील ५० आशा वर्कर्सनी आम्हाला जाधव मॅडम यांच्याकडून ...

Asha workers immediately withdrew after sending the group organizer on leave | समूह संघटकास रजेवर पाठविल्याने आशा वर्कर्स तूर्त मागे हटल्या

समूह संघटकास रजेवर पाठविल्याने आशा वर्कर्स तूर्त मागे हटल्या

Next

दरम्यान, १० जूनला सकाळी ११ वाजता मात्र आंदोलनाच्या चौथ्या दिवशी यातील ५० आशा वर्कर्सनी आम्हाला जाधव मॅडम यांच्याकडून कसलाच त्रास नाही. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करू नये, अशी भूमिका घेत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला होता तर पंचायत समितीच्या गेटवर २५० आशा वर्कसनी जाधव यांची बदली होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. सोमवारपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करत राडा घालावा लागेल, अशी भूमिका घेतली होती .

पंचायत समितीच्या अंगणात २५० विरुद्ध ५० अशी दोन आंदोलने दिसत होती; परंतु गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी समूह संघटक जाधव यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून त्यांना १० जून पासून रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांना कामावर येण्यास मज्जाव केला असल्याचे पत्र दिल्याने तूर्तास हे आंदोलन थांबले आहे.

----

या कारणांसाठी सुरु होते आंदोलन

तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांना तालुका समूह संघटकांकडून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळते. आशासेविकांचा मोबदला कपात करणे, गटप्रवर्तकांच्या मानधनात कपात करण्याची धमकी देणे, गटप्रवर्तकांना सकाळी ऑफिसात रिपोर्टिंगला बोलावून संध्याकाळपर्यंत विनाकारण ऑफिस बाहेर बसून ठेवणे, शासनाकडून येणारी कोणतीही माहिती न देणे, अशा स्वरूपाची अडवणूक तालुका समूह संघटकांकडून होत असल्याने त्यांची बदली करावी यासाठी हे आंदोलन सुरू होते.

----

लाल बावटा युनियनच्या सचिवा पुष्पा पाटील यांच्या तक्रारीनुसार जाधव यांची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. दरम्यान, जाधव यांना १० जूनपासून रजेवर पाठविण्यात आले आहे.

- गणेश मोरे, गटविकास अधिकारी

------१०मोहोळ-आशावर्कर्स/ १० मोहोळ आशावर्कर्स१

मोहोळ पंचायत समितीच्या गेटवर समूह संघटकांवर कारवाईसाठी उपोषणास बसलेल्या आशा वर्कर्स

कारवाई नको म्हणून पंचायत समितीच्या गेटच्या आत उपोषणास बसलेल्या आशा वर्कर्स

Web Title: Asha workers immediately withdrew after sending the group organizer on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.