विठ्ठलाला दुधाचा अभिषेक; सदाभाऊ खोतसह परिचारकानीही केली आंदोलनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:58 AM2020-08-01T09:58:16+5:302020-08-01T17:57:37+5:30

दुधदरवाढ आंदोलन पेटले; राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Anointing of milk to Vitthal; Along with Sadabhau Khot, Paricharkani also started the agitation | विठ्ठलाला दुधाचा अभिषेक; सदाभाऊ खोतसह परिचारकानीही केली आंदोलनाला सुरुवात

विठ्ठलाला दुधाचा अभिषेक; सदाभाऊ खोतसह परिचारकानीही केली आंदोलनाला सुरुवात

Next
ठळक मुद्देदूध दरवाढीसाठी रयत क्रांती चे आजपासून राज्यभर आंदोलनपंढरपुरातून सुरू झाली आंदोलनाला सुरुवातरस्त्यावर टायर जाळून सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा श्री.पांडुरंगाच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे या मागणीसाठी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे नातू प्रणव परिचारक यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आंदोलन केले आहे.

राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. ६० लाख लिटर दूध पिशवी बंद मध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दुध अतिरिक्त असून त्याची दूध भुकटी तयार केली जात आहे. सध्या गाईच्या दुधाला २० रुपये लिटर भाव आहे. तरी मागील देवेंद्रजी फडणवीस सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये थेट अनुदान दिले होते व भुकटीला ५० रुपये निर्यात अनुदान दिले होते. याच धर्तीवर या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी केली. परदेशातून भुकटी आयात केलेली नाही परंतु या सरकार मधील काही लोक जाणीव पूर्वक कांगावा करत आहेत त्यांनी आधी शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. खोत यांच्यासह प्रणव परिचारक ही उपस्थित होते. 

यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के  व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Anointing of milk to Vitthal; Along with Sadabhau Khot, Paricharkani also started the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.