सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:34 AM2020-03-22T11:34:17+5:302020-03-22T11:39:04+5:30

गुजरातहून आलेल्या वृद्धेला कोरोनाच्या संशयानं दवाखान्यात हलवताना रिक्षाचालकानं पोलिसाला विचारलं, ‘पैसे कोण देणार ?’

An angry woman in Solapur police say, 'Hey ... pay money or Ray' | सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’

सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’

Next
ठळक मुद्देअहमदाबादहून आलेली महिला नळबाजार चौकात आपल्या पिशव्यांसह बसलेली पाहून स्थानिक लोकांना कोरोनाबाबतचा संशय आलानळबाजार चौकात एका बंद दुकानासमोर एक महिला आपल्या पिशव्यांसह बसली होतीस्थानिक लोकांनी तिला कुठून आला आहात अशी विचारणा केली. तेव्हा त्या महिलेने मी अहमदाबाद येथून आल्याचे सांगितले

संताजी शिंदे 

सोलापूर : अहमदाबादहून आलेली महिला नळबाजार चौकात आपल्या पिशव्यांसह बसलेली पाहून स्थानिक लोकांना कोरोनाबाबतचा संशय आला. माहिती समजताच सदर बझार पोलीस ठाण्याचे कर्मचारी गाडीतून चौकात आले. तिला शासकीय रुग्णालयात पाठवायचे होते; मात्र कोणी तयार होईना. रस्त्यावरून जाणाºया एका रिक्षा चालकास आवाज दिला, तो संकोच करीत असल्याचे पाहून महिला पोलीस कर्मचाºयाने आरे पैसे देते रे बाबा ये इकडं..., फुकट घेऊन जाऊ नको असे म्हणत रिक्षातून शासकीय रुग्णालयात पाठविले. कोरोना व्हायरसमुळे सर्वजण चिंतेत होते. 

नळबाजार चौकात एका बंद दुकानासमोर एक महिला आपल्या पिशव्यांसह बसली होती. स्थानिक लोकांनी तिला कुठून आला आहात अशी विचारणा केली. तेव्हा त्या महिलेने मी अहमदाबाद येथून आल्याचे सांगितले. हे एकूण स्थानिक लोकांनी प्रथमत: पोलीस व स्थानिक नगरसेवक भारतसिंग बडुरवाले यांना माहिती दिली. चौकात आलेल्या पोलीस व भारतसिंग बडुरवाले वृद्ध महिलेकडे चौकशी केली; मात्र महिला स्पष्ट काही बोलत नव्हती,ती अहमदाबाद येथून आली असून नातेवाईकांकडे जायचं आहे असं सांगत होती. तिला शासकीय रुग्णालयात घेऊन जायचे कसे? असा प्रश्न पोलिसांना पडला. एक मीटर अंतरावर राहून सर्वजण तिला शासकीय दवाखान्यात पाठवण्याची चर्चा करू लागले. 

महिला पोलीस कर्मचाºयाने रस्त्यावरून जाणाºया एका रिक्षावाल्यास आवाज दिला. रिक्षाचालक थांबला खरा; मात्र तो संकोच करीत होता. तेव्हा महिला पोलीस कर्मचाºयाने त्याला आरे पैसे देते रे बाबा ये इकडं, फुकट घेऊन जाऊ नको असे म्हणत जवळ बोलावले. 
पोलिसांनी वृद्ध महिलेस रिक्षात बसण्याची विनंती केली. वृद्ध महिला उठली व रिक्षात बसली, तेव्हा पोलिसांनी रिक्षा चालकास तोंडाला रुमाल बांधण्यास सांगितले. रिक्षा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने निघून गेली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

वृद्धेची तपासणी केली अन् सोडून दिले- भारतसिंग बडुरवाले
वृद्ध महिला चौकात बसल्यानंतर आम्हाला लोकांनी माहिती दिली, तिच्याकडे विचारणा केली असता ती इथे नातेवाईक असल्याचे सांगत होती. तिला त्यांचा पत्ता माहीत नव्हता, अहमदाबाद येथून आल्याने आम्ही प्रथमत: तिला शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. डॉक्टरांनी तपासणी केली, वृद्ध महिलेस काही लक्षणे नसल्याचे पाहून परत पाठवले. पुन्हा महिलेस नळबझार चौकात सोडले, ती नातेवाईकाच्या शोधात निघून गेली अशी माहिती नगरसेवक भारतसिंग बडुरवाले यांनी दिली. 

व्हॅनमधून घेऊन जाण्याचे धाडस होईना
- नळबाजार येथे अहमदाबाद येथून आलेली वृद्ध महिला बसल्याची माहिती समजताच, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व्हॅनमधून आले. चौकशी केल्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात सोडायचे असे असा प्रश्न पडला? मात्र कोरोनाच्या धास्तीने तिला पोलीस व्हॅनमधून घेऊन जाण्याचे धाडस पोलिसांना होत नव्हते

Web Title: An angry woman in Solapur police say, 'Hey ... pay money or Ray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.