आघाडी सरकार लवकरच पडेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:54+5:302021-04-15T04:21:54+5:30

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी ...

The alliance government will fall soon ... | आघाडी सरकार लवकरच पडेल...

आघाडी सरकार लवकरच पडेल...

Next

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लॅनिंग नाही. सरकारमध्ये विलपॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असेही पाटील म्हणाले.

पॅकेज फसवं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का, असा सवाल त्यांनी केला. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.

आरोग्य सुविधेबाबत प्लॅनिंग नाही

राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच प्लॅनिंग केले नाही. आम्हा आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दोषींवर कारवाई होणारच

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून होत असलेल्या चौकशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सीबीआय चौकशीतून जे दोषी आहेत, ते उघड होईल. दोषी असणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. तसेच त्यांच्यावर अटकेपासून ते सर्व कारवाई करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: The alliance government will fall soon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.