अक्कलकोट परिसरातील जैवविविधतेचा खजिना दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:18 PM2020-05-22T12:18:23+5:302020-05-22T12:20:16+5:30

जागतिक जैवविविधता दिन विशेष; सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणे जैवविविधतेने नटलेली...

Akkalkot area biodiversity treasure neglected | अक्कलकोट परिसरातील जैवविविधतेचा खजिना दुर्लक्षित

अक्कलकोट परिसरातील जैवविविधतेचा खजिना दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देनामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अनेक पक्षी अक्कलकोट परिसरात येतातकाही दुर्मिळ पक्षी या परिसरात अंडी देखील घालत असल्याने ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहेनैसर्गिक तसेच कृत्रिम तलावात पाणी साचते. कुरनूर धरणामुळे नटलेली जैवविविधता दुर्लक्षित

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक ठिकाणे ही जैवविविधतेने नटलेली आहे. मात्र आपल्यापुढे नान्नज, हिप्परगा आदी भागांची चर्चा होते. अक्कलकोट तालुक्यातही जैवविविधता असून, मागील काही वर्षांपासून याकडे पर्यावरणप्रेमी लक्ष वेधत आहेत. यामुळे दुर्लक्षित असलेली जैवविविधता समोर आणण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी येथे काम करण्याची गरज आहे.

अक्कलकोट तालुक्यात कुरनूर धरण ही जमेची बाजू आहे. सोलापूर शहरात समतल भाग आहे. अक्कलकोट परिसरात डोंगर नसले तरी उंचवटा असलेला भाग आहे. यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावात पाणी साचते. कुरनूर धरणामुळे नटलेली जैवविविधता दुर्लक्षित आहे.
अक्कलकोट येथील राजवाड्यामध्ये प्राण्यांची शिकार केलेले अवशेष आहेत. खूप वर्षांपूर्वी शिकारी झाल्या होत्या. त्याच्या नोंदी मिळाल्यास त्या प्राण्यांचा नेमका परिसर समजेल. तिथे योग्य त्या उपाययोजना करून पशू-पक्ष्यांसाठी ती जागा अधिक योग्य करता येईल.

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अनेक पक्षी अक्कलकोट परिसरात येतात. इंडियन स्किमर, पांढºया भुवईचा बुलबुल पक्षी आढळतो. काही दुर्मिळ पक्षी या परिसरात अंडी देखील घालत असल्याने ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. मागील चार वर्षांपासून पांढºया भुवईचा बुलबुल आढळत आहे.

 कवडी मैना, करड्या डोक्याची मैना, गुलाबी मैना, गुलाबी चटक, माळमुनिया, लालमुनिया, काळ्या डोक्याची मनोली, हळद्या, पाणकावळा, धोबी, नदी सुरय आदी दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन कुरनूर धरण क्षेत्रामध्ये होते.

समृद्ध जैवविविधता

  • - हिप्परगा तलाव : युरोप येथील व्हाईट स्टॉर्क (पांढरा करकोचा), मंगोलियातील पट्टकदंब यांच्यासह वूली नेकड स्टॉर्क, पेंटेड स्टॉर्क, कॉमन क्रेन, लिटल कॉरमोरन्टस, ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन, रिव्हर टर्न्स, ड्रॉन्गो, स्टील्टस असे पक्षी हिप्परगा तलाव परिसरात आढळतात.
  • - बोरामणी : तुळजापूर तालुक्यापासून हा भाग जवळ आहे. या परिसरात लांडगा, हरण, खोकड आदी प्राणी आढळतात. मागील वर्षी याच परिसरात इजिप्शियन वल्चर म्हणजेच पांढºया पाठीचा गिधाड हा दुर्मिळ पक्षी अनेक वर्षांनंतर दिसून आला.
  • - लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने निसर्ग आपल्या पूर्वपदावर येत असल्याचा प्रत्यय येत आहे. सोलापुरात मागील अनेक वर्षांपासून दिसत नसणारी नील गाय ३ मे रोजी कासेगाव (उळे कासेगाव) परिसरात आढळली. 

वातावरणात बदल, वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण, वृक्षतोड, तापमानात वाढ, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणे, यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट अथवा दुर्मिळ होत आहेत. त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होत आहे. निसर्गनिर्मित प्रत्येक प्रजातीचे जतन करणे जरुरीचे आहे.
-संतोष धाकपडे, पर्यावरणप्रेमी

Web Title: Akkalkot area biodiversity treasure neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.