अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून नको; शासकीय निधीमधूनच साकारायला हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 04:07 PM2020-08-14T16:07:05+5:302020-08-14T16:10:15+5:30

धनगर विवेक जागृती अभियान संघटनेची मागणी;  कुलगुरूंची चौकशी करा, ढोबळेंना समितीतून वगळा

Ahilya Devi's memorial not from the masses; It should be funded from government funds only! | अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून नको; शासकीय निधीमधूनच साकारायला हवे !

अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून नको; शासकीय निधीमधूनच साकारायला हवे !

googlenewsNext
ठळक मुद्दे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ?स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावेअहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी

सोलापूर : विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

   तसेच हे स्मारक शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भूमिका ढोणे यांनी मांडली आहे. विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याला विरोध करणाºया माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून वगळावे, अशी मागणी त्यांनी कली आहे. दरम्यान, जागृती समितीचे ढोणे यांनी आज जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अनुषंगिक मागण्या केल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे. स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी. 

यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईची चौकशी व्हावी, विद्यापीठाला पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळासाठी आवश्यक तरतूद करावी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून तातडीने वगळण्यात यावे, या प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

कुलगुरूंच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
 गेले दोन-अडीच महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे. धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभारण्याचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्व जण अस्तित्वाची लढाई लढत असताना कुलगुरू फडणवीस यांनी अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून अनुषंगिक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे. काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोन वेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाºयांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत. आक्षेपार्ह बाब म्हणजे ज्या लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यायला विरोध केला. त्यांना अहिल्यादेवींच्या स्मारक समितीवर सन्मानाने घेण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या प्रत्येक बाबीची पडताळणी गरजेची आहे.

...अन्यथा आंदोलन !
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्ताने शासनाला हे निवेदन देत आहोत. ज्यांनी लोकोद्धारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, हा प्रकार लांच्छनास्पद आहे. याउपर फक्त धनगर समाजाची वर्गणी डोळ्यांसमोर ठेवून करण्यात येत असलेले नियोजन जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा आणि अहिल्यादेवींची सुरू असलेली अवहेलना थांबवाबी. सध्या कोरोना संकटात आमचे प्रशासनाला सहकार्य आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

Web Title: Ahilya Devi's memorial not from the masses; It should be funded from government funds only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.