दहावी, बारावीच्या परीक्षार्थी दिव्यांगांना लेखानिक मिळेना; काय आहे कारण घ्या जाणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 07:16 PM2021-02-28T19:16:15+5:302021-02-28T19:16:20+5:30

कोरोनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची होत आहे धावपळ : जिद्दीच्या जोरावर परीक्षा देण्यास विद्यार्थी तयार

After searching for two months, Divyang students found a scribe | दहावी, बारावीच्या परीक्षार्थी दिव्यांगांना लेखानिक मिळेना; काय आहे कारण घ्या जाणून

दहावी, बारावीच्या परीक्षार्थी दिव्यांगांना लेखानिक मिळेना; काय आहे कारण घ्या जाणून

Next

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील दोन महिन्यांमध्ये होणार आहेत. या परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याची विशेष सोय असते.

पण यंदा कोरोनामुळे दिव्यांग विद्यार्थांना रायटर अर्थात लेखनिकांकडून नकार मिळत असल्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना रायटर शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना तर दीड ते दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर रायटर मिळाले.

अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना सोबत रायटर अर्थात लेखनिक येऊन परीक्षा देण्यास परवानगी असते तर कर्णबधिर विद्यार्थ्यांना जादा वेळ मिळतो. प्रतिवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने परीक्षेच्या वेळी मदतीसाठी काही शाळा आणि पालक पुढाकार घेत होते. यामुळे यंदा कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीपोटी तयार झालेले रायटर यांच्याकडून नकार येत आहे.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून रायटर शोधण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. तरीही दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली जिद्द न हरता परीक्षा देऊन त्यात चांगले गुण मिळवण्याचा चंग बांधला आहे.

 

मागील वर्षी अनेक विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर म्हणून मदत करण्यास तयार होते. पण यंदा अनेकांना विनंती करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थांचे अभ्यासावर मन एकाग्र होत नाही. यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता वाटत आहे.

- लोखंडे, दिव्यांग विद्यार्थ्याचे पालक

यंदा रायटर शोधण्यामध्ये आमची खूप पळापळ झाली. अनेक दिवस प्रयत्न करूनही रायटर मिळत नसल्यामुळे अनेक वेळा माझी मुलगी रडत होती. पण तरीही अनेक शाळांना भेटी देऊन मदत करण्याचे आवाहन केले. जवळपास दोन महिन्यांनंतर आम्हाला रायटर मिळाला. कोरोनाच्या भीतीपोटी मदत करणारे ही दूर गेल्याचा यंदा आम्हाला आला.

-बसवराज सुतार, दिव्यांग विद्यार्थिनीचे पालक

 

कोट

 

यंदा रायटर शोधण्यासाठी आम्ही जवळपास दहा जणांचा ग्रुप शहरातील अनेक महाविद्यालयात फिरलो. त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर मला रायटर मिळाला. अनेकांची मदत करण्याची भूमिका ही दिसून आली.पण कोरोनाची भीतीपोटी अनेक जण मागे सरसावत होते.

 

मनोज कदम, दिव्यांग विद्यार्थी

Web Title: After searching for two months, Divyang students found a scribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.