पंढरपूरची ३६ गाढवे निघाली थंड हवेच्या ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या उटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:06 PM2021-01-11T12:06:19+5:302021-01-11T12:37:19+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

36 donkeys from Pandharpur got up which is famous as a place of cool air | पंढरपूरची ३६ गाढवे निघाली थंड हवेच्या ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या उटीला

पंढरपूरची ३६ गाढवे निघाली थंड हवेच्या ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या उटीला

Next

पंढरपूर : भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ३६ गाढवांना पंढरपूर पोलीस प्रशासनाने थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या उटी (तामिळनाडू) येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाडयात पाठवले आहे.

पंढरपुरातील सारडा भवन जवळील भिमा नदीपात्रामध्ये पंढरपूर येथे सारडा भवनजवळील भिमा नदीतून वाळू उपसा करुन ती वाळू ११ गाढवावरती लादून घेवून जात असताना मिळून आले होते.

जुना अकलूज रोड जॅकवेलजवळील भिमा नदी पात्रामध्ये, पंढरपूर येथे १८ गाढवावरती घेवून जात असताना मिळून आले होते. खडकीदेवीच्या मंदिराजवळील भिमा नदीपात्रून वाळू उपसा करुन ती वाळू ७ गाढवावरती लादून घेवून जात असताना मिळून आले होते, अशी एकूण ३६ गाढवांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले होते.

गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंढवाडा नाही. यामुळे मागील चार दिवसापासून ही ३६ गाढवे पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आली होती. त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच गाढवे पळून जाऊ नये, यासाठी २ होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

या कारवाई संदर्भात प्रथम वर्ग
न्यायदंडाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त करुन घेवून ३६ गाढव प्राण्यांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेच्याकामी इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल ॲण्ड नेचर संस्था, निलगिरी, उटी (तामिळनाडू) कडे रवाना करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ. सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, पोना. गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, पोकॉ सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनिल बनसोडे यांनी केली.

Web Title: 36 donkeys from Pandharpur got up which is famous as a place of cool air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.