सोलापुरात १९ वर्षीय तरुणाचा खून; ट्रकच्या बॉनेटवर आला मृतदेह आढळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:29 PM2019-10-26T12:29:29+5:302019-10-26T12:31:34+5:30

खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट; शहर पोलीसांचा तपास सुरू

A 29-year-old boy murdered in Solapur | सोलापुरात १९ वर्षीय तरुणाचा खून; ट्रकच्या बॉनेटवर आला मृतदेह आढळून

सोलापुरात १९ वर्षीय तरुणाचा खून; ट्रकच्या बॉनेटवर आला मृतदेह आढळून

googlenewsNext
ठळक मुद्दे- शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली घटना- घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल- मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल

सोलापूर : जुना पुना नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलजवळील नाकोडा रेसिडेन्सी समोरील मैदानात तरुणाचा शनिवारी पहाटे खून झाला. ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट दिली.

सुरज परमेश्वर कांबळे (वय १९ रा़ जुना पुना नाका, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरज कांबळे याचे रात्री काही तरुणांसोबत भांडण झाले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी सहा वाजता तो जखमी अवस्थेत एका ट्रकच्या बॉनेटवर पडलेला आढळून आला.

यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मडिवाळ यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तो मयत झाल्याचं सांगितले. रात्री काही तरुणांनी त्याला मारहाण करून त्याचा खून  केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


 

Web Title: A 29-year-old boy murdered in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.