२३ दिवसांत सोलापुरातील ८५ हजार ग्राहकांनी भरली ८१ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 06:27 PM2021-02-25T18:27:01+5:302021-02-25T18:27:13+5:30

महावितरण - आर्थिक कोंडी फोडण्यासाठी वीजबिल भरण्यास वेग

In 23 days, 85,000 customers in Solapur paid arrears of Rs 81 crore | २३ दिवसांत सोलापुरातील ८५ हजार ग्राहकांनी भरली ८१ कोटींची थकबाकी

२३ दिवसांत सोलापुरातील ८५ हजार ग्राहकांनी भरली ८१ कोटींची थकबाकी

googlenewsNext

सोलापूर : गंभीर स्वरूप धारण केलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करा, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ८५ हजार ८२५ ग्राहकांनी अवघ्या २३ दिवसांत ८१ कोटी २२ लाखांचा भरणा केला आहे. गेल्या १ एप्रिल २०२० पासून या ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नव्हते. मात्र वीजबिल भरण्यास सर्वच थकबाकीदार ग्राहकांनी आता वेग दिला असल्याचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. 

गेल्या एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. मात्र, वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवार (दि.२३) पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ८५ हजार ८२५ ग्राहकांनी ८१ कोटी २२ लाखांचा भरणा केला आहे. या सर्व ग्राहकांनी गेल्या एप्रिल २०२० पासून प्रथमच वीजबिलाचा भरणा केला आहे.

थेट संपर्क साधत वारंवार आवाहन करूनदेखील थकबाकीचा भरणा न केल्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

----------

शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि. २८) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणच्या वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यायाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले.

Web Title: In 23 days, 85,000 customers in Solapur paid arrears of Rs 81 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.