११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:31 PM2019-10-20T12:31:41+5:302019-10-20T12:40:51+5:30

सोलापूर जिल्ह्यात १५४ उमेदवार;  मतदानासाठी यंत्रणा सज्ज; महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना दिले आदेश

११ Assembly Constituency; Appointment of 19 thousand 5 persons | ११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य

११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य

Next
ठळक मुद्देईव्हीएम मशीन व मतदान नोंदविण्याचे साहित्य वाटप मतदान केंद्रावर मतदारांसाठी १५ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामतदानासाठी ४०६ विभागीय अधिकाºयांची नियुक्ती केली

सोलापूर : मतदानादिवशी पाऊस आला तर मतदान केंद्र परिसरात पाणी व चिखल साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेच्या अधिकाºयांना दिले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली़ जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवार दि. २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्याची सर्व तयारी झाली असून, रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व निवडणूक कार्यालयातून मतदान अधिकाºयांना साहित्य वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. आता दोन दिवस उमेदवारांना घरोघरी जाऊन तोंडी माहिती सांगण्यास मुभा आहे. मतदान घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी १९ हजार २५२ कमÊचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्येक निवडणूक कायाÊलयातून मतदान अधिकाºयांना ईव्हीएम मशीन व मतदान नोंदविण्याचे साहित्य वाटप केले जाणार आहे. तेथून वाहनाने प्रत्येक कमÊचाºयाने नियुक्तीच्या ठिकाणी सायंकाळी ४ वाजेपयÊंत हजर व्हायचे आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी १५ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 

दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारीही पाऊस आला तर मतदान केंद्राच्या परिसरात पाणी साचणार नाही किंवा चिखल होणार नाही, याबाबत काळजी घेण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. शनिवारसारखे उशिरापयÊंत पाऊस झाल्यास मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची तरतूद आयोगाने केलेली नाही. मतदारांनी निभÊयपणे व उत्स्फूतÊपणे मतदान करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. 

मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी कमÊचाºयांची नियुक्ती केलेली आहे. रविवारी सवÊ कमÊचारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी जातील. मतदानासाठी ४०६ विभागीय अधिकाºयांची नियुक्ती केली असून, त्यांच्यासाठी २२२ जीपची व्यवस्था केली आहे. तर मतदान केंद्रावरील कमÊचाºयांसाठी ५२२ एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुकानिहाय बसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: ३९, माढा: ४४, बाशीÊ: ६०, मोहोळ: ४९, शहर उत्तर: ४६, शहर मध्य: ४८, अक्कलकोट: ६१, दक्षिण सोलापूर: ४८, पंढरपूर: ४८, सांगोला: ३९, माळशिरस: ४०. क्रिटिकल मतदान केंद्रांवर सीसी कॅमेºयाची नजर असणार आहे. 

विधानसभानिहाय मतदान केंद्र व ईव्हीएमची व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा         मतदान केंद्र     ईव्हीएम     बॅकअप     व्हीव्हीपॅट

  • - करमाळा         ३३४     ४०१     ४०१     ४३४
  • - माढा         ३४१     ४०९     ४०९     ४३३
  • - बाशीÊ         ३२५     ३९०     ३९०     ४४३
  • - मोहोळ         ३२९     ३९५     ३९५     ४२८
  • - शहर उत्तर         २७६     ३३१     ३३१     ३५९
  • - शहर मध्य     २९३     ३५२     ७०४     ३८१
  • - अक्कलकोट     ३५८     ४३०     ४३०     ४६५
  • - दक्षिण सोलापूर     ३०८     ३७०     ३७०     ४००
  • - पंढरपूर         ३२८     ३९४     ७८८     ४२६
  • - सांगोला         २९१     ३४९     ६८९     ३७८
  • - माळशिरस     ३३८     ४०६     ४०६     ४३९
  • - एकूण         ३५२१     ४२२७     ५३२१     ४५७७ 

Web Title: ११ Assembly Constituency; Appointment of 19 thousand 5 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.