'या' स्टेडियमची लोकांनी केली महिलांच्या गुप्तांगाशी तुलना, पण सत्य वेगळंच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:12 PM2019-05-03T13:12:50+5:302019-05-03T13:14:50+5:30

कतारमधील अल-वकराह स्टेडियम फिफा वर्ल्डकप २०२२ साठी तयार झालं आहे. याचं स्टेडियममध्ये क्वार्टर फायनल खेळलं जाणार आहे.

World cup Vagina stadium is finally unveiled after being ridiculed by fans | 'या' स्टेडियमची लोकांनी केली महिलांच्या गुप्तांगाशी तुलना, पण सत्य वेगळंच आहे!

'या' स्टेडियमची लोकांनी केली महिलांच्या गुप्तांगाशी तुलना, पण सत्य वेगळंच आहे!

googlenewsNext

कतारमधील अल-वकराह स्टेडियम फिफा वर्ल्डकप २०२२ साठी तयार झालं आहे. याचं स्टेडियममध्ये क्वार्टर फायनल खेळलं जाणार आहे. ४० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियमची चर्चा यातील कूलिंग टेक्नॉलॉजीमुळे होत आहे. पण ब्रिटीश-इराकी आर्किटेक्ट Dame Zaha Hadid यांनी केलेल्या या स्टेडियमच्या डिझाइनवरून फार वादही झाला. फुटबॉल फॅन्स आणि इतरही लोक या डिझाइन ट्रोल करत म्हटलं होतं की, याचा आकार व्हजायनासारखा आहे. 

मुळात डिझाइन कशाचं आहे?

२०१६ मध्ये हार्ट अटॅकच्या कारणामुळे आर्किटेक्ट Dame Zaha Hadid यांचं निधन झालं होतं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. २०१३ मध्ये डेम जहा हदीद यांनी जेव्हा पहिल्यांदा हा प्लॅन समोर ठेवला होता. तेव्हा त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, या स्टेडियमचा आकार अरबमध्ये मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक नावेच्या आकारातून प्रेरित आहे. पण त्यानंतर या प्लॅनचे फोटो व्हायरल झाले होते आणि लोकांना याची तुलना महिलांच्या गुप्तांगाशी केली होती. 

जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा डेम यांना फारच राग आला होता. त्यावेळी त्या नाराजी व्यक्त करत म्हणाल्या होत्या की, 'लोकांचं अशाप्रकारे बोलणं फारच शरमेची बाब आहे. ते काय बोलतात? प्रत्येक वस्तू ज्यात छिद्र आहे, ती व्हजायना आहे का? हा सगळा मुर्खपणा आहे'.

डेम यांचं याधीचं काम

इराकमध्ये जन्मलेल्या डेमी यांनी अल-वकराह स्टेडियमसोबतच २०१२ लंडन ऑलंम्पिकमध्ये अॅक्टेटिक्स सेंटर, इटलीमध्ये MAXXI संग्रहालय आणि चीनमध्ये गुआंगजो ओपेरा हाऊसचं डिझाइन केलं आहे. 

कूलिंग सिस्टीमची चर्चा का?

कतारची राजधानी दोहापासून १२ किमी अंतरावर तयार करण्यात आलेल्या या स्टेडियमला वाळवंटातील गरमीपासून वाचवण्यासाठी असं डिझाइन करण्यात आलं आहे. अल-वकराह स्टेडियममध्ये एका नव्या क्रांतिकारी एअर कंडीशनिंगची टेक्निक वापरण्यात आली आहे. या टेक्निकच्या माध्यमातून स्टेडियमचं तापमान साधारण २२ डिग्री सेल्सिअस कायम ठेवलं जाऊ शकतं. 




या स्टेडियममध्ये पाईपच्या माध्यमातून १०० व्हेंटिलेशन यूनिट्स लावण्यात आले आहेत. त्यासोबतच मैदानावर सावली पडावी यासाठी ९२ मीटरचं रीट्रॅक्टेबल छत लावण्यात आलं आहे. दरम्यान, वर्ल्ड कपआधी या स्टेडियममध्ये आमिर कपची फायनल मॅच खेळली जाणार आहे. 

Web Title: World cup Vagina stadium is finally unveiled after being ridiculed by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.