#SareeTwitter : सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत या ट्रेंडची सर्वांनाच भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:53 PM2019-07-17T16:53:00+5:302019-07-18T11:14:41+5:30

दोन दिवसांपासून एक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ट्वीटरवर सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू असून याने सर्वांनाच भूरळ घातली आहे. 

Women Are Sharing Their Favourite Pics For #SareeTwitter | #SareeTwitter : सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत या ट्रेंडची सर्वांनाच भुरळ

#SareeTwitter : सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत या ट्रेंडची सर्वांनाच भुरळ

Next
ठळक मुद्देट्वीटरवर सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू असून याने सर्वांनाच भूरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत.काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम आहे. सातत्याने नवनवीन गोष्टी तिथे अपडेट होत असतात. एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड हे सातत्याने येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून असाच एक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ट्वीटरवर सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू असून याने सर्वांनाच भूरळ घातली आहे. 

SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. वेगाने हा ट्रेंड व्हायरल होत आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. प्रियंका गांधी यांनी बुधवारी (17 जुलै) 22 वर्षे जुना त्यांचा एक साडीतील फोटो ट्वीट केला आहे. प्रियंका यांनी '22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा फोटो', असं कॅप्शन दिलं आहे. तसेच SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला आहे. 



SareeTwitter हॅशटॅगची अशी झाली सुरुवात

न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीविषयक एक आर्टिकल छापण्यात आले होते. या आर्टिकलमध्ये साडीची प्रतिष्ठा आणि इतिहास याबाबत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यावर साडीला प्रसिद्धी देण्यात आली. प्रमोट केलं गेलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीतील विजयानंतर बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अशा आशयाचा मजकूर आर्टिकलमध्ये छापण्यात आला आहे. या आर्टिकलमधील काही गोष्टींमुळे अनेकजण नाराज झाले. त्यानंतर काही महिलांनी आपले साडीतील फोटो ट्विटरवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ट्रेंडला फॉलो करत पैठणी नेसलेला फोटो शेअर केला आहे. 


बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही तिचा साडीतील सुंदर फोटो शेअर केला आहे. 


सोमवारी (15 जुलै) सकाळपासून हा ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही  #SareeTwitter हा ट्रेंड फॉलो केला आहे. काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनीही अनेक फोटो शेअर केले आहेत.

 










 

Web Title: Women Are Sharing Their Favourite Pics For #SareeTwitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.