Womans viral tweet on being happily married to a short man | ...म्हणून महिलेच्या 'या' फोटोची होतेय चर्चा, कारण तुम्हालाही नक्कीच आवडेल!
...म्हणून महिलेच्या 'या' फोटोची होतेय चर्चा, कारण तुम्हालाही नक्कीच आवडेल!

साधारणपणे लग्न करायचं म्हटलं तर उंची फारच महत्वाची मानली जाते. म्हणजे मुलाच्या हाईटनुसारच मुलगी मिळायला पाहिजे. असं नसेल तर जोडी कशी दिसेल इत्यादी इत्यादी. पण मुळात उंचीने काही फरक पडत नसतो. हाच उंचीचा भ्रम एका महिलेने तोडलाय. या महिलेची उंची ६ फूट २ इंच इतकी तर तिच्या पतीची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. दोघांच्याही लग्नाला ८ वर्ष झाले असून दोघेही आनंदाने संसार करत आहेत.

Lizz Adams व्यवसायाने अभिनेत्री आणि लेखिका आहे. तिनेचा हा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत तिने लिहिले की, 'गेल्या ८ वर्षांपासून माझं ५ फूट ५ इंचाच्या राजासोबत लग्न झालंय'. तिने हेही सांगितलं की, तिची उंची ६.२ आहे. बस लोकांना तिची ही गोष्ट आवडली. ही बातमी लिहून होईपर्यंत या फोटोला १.५ लाखपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि २४ हजारांपेक्षा जास्त रिट्वीट आहेत.

Lizz ही पोस्ट अनेकांसाठी खास ठरली. अशाच काही कपल्सनी त्यांचेही फोटो आणि उंचीचे किस्से सोशल मीडियात शेअर केलेत. आणि ते सुद्धा हेच सांगत आहेत की, उंचीचा काहीही संबंध नसतो.


Web Title: Womans viral tweet on being happily married to a short man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.