...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 08:24 PM2021-11-27T20:24:48+5:302021-11-27T20:25:18+5:30

woman marries cow : या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.  

Woman marry cow thinks reincarnation of dead husband in cambodia | ...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Next

नवी दिल्ली : एका महिलेने चक्क गाईसोबत लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. महिलेच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र, या महिलेने असे का केले? यामागील कारणही मजेशीर आहे. या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.  

कंबोडियाच्या (Cambodia) क्राती प्रांतात राहणारा खिम हांग (74) अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे गाईसोबत लग्न. द सनच्या (The Sun) वृत्तानुसार,  खिम हांग या महिलेने गाईसोबत लग्न केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. मात्र गावातील अनेक लोकांचा दावा आहे की, त्यांनी हे लग्न पाहिले आहे आणि त्यांनी त्यात हजेरीही लावली आहे.

महिलेने गाईसोबत का लग्न केले?
दरम्यान, खिम हांग या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर खिम हांग यांनी एका गायीशी लग्न केले, कारण तिचे असे म्हणणे आहे की, तिच्या मृत पतीने गायीच्या रूपात दुसरा जन्म घेतला आहे. खिम हांग यांना तिच्या मृत पतीचे सर्व गुण या गायीमध्ये जाणवतात. आता ही गाय खिम हांग यांच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची सदस्य बनली आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याची सेवा करते.

'पतीसारखे माझ्यावर प्रेम करते'
खिम हांग यांनी म्हटले की, गायीचा जन्म झाला तेव्हा तिने तिच्यासोबत बराच वेळ घालवला. या दरम्यान गाय माझे हात आणि चेहरा चाटत असे आणि अनेक वेळा ती माझे चुंबन घेत असे. पती जसे माझ्यावर प्रेम करत होते, तसेच गाय माझ्यावर प्रेम करत आहे. त्यामुळे मला वाटले की गायीच्या रूपात माझा नवरा परत आला आहे.
 

Web Title: Woman marry cow thinks reincarnation of dead husband in cambodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.