सलाम! लेक देतेय कॅन्सरशी लढा; आईनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 01:24 PM2021-01-27T13:24:47+5:302021-01-27T13:44:16+5:30

एका मुलीला कॅन्सरचा सामना करावा लागत होता. तिच्या आईनं तिच्यासाठी जे केलं ते पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील. 

When mother blamed herself for her cancer patient daughter video goes viral | सलाम! लेक देतेय कॅन्सरशी लढा; आईनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.....

सलाम! लेक देतेय कॅन्सरशी लढा; आईनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.....

Next

आईच्या प्रेमापुढे जगातील सगळ्यात गोष्टी लहान वाटतात.  आईचे प्रेम आणि माया याची तुलना कशाशीही करता येत नाही. जेव्हा आपल्या मुलाला जेव्हा वेदना होतात तेव्हा आई काहीही करून आपल्या बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करते. तसंच  मुलांच्या समस्यांमध्ये साथ देण्याची तिची तयारी असते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलीला कॅन्सरचा सामना करावा लागत होता. तिच्या आईनं तिच्यासाठी जे केलं ते पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील. 

रॅक्स चॅपमॅनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की,  आई आपल्या मुलीला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओत मुलगी कॅन्सरशी लढा देत आहे. या व्हिडीओमध्ये सगळ्यात आधी आई मुलीचे केस कापत असते. त्यानंतर स्वतःचे सुद्धा केस कापते. आईनं असं केल्यानंतर सुरूवातीला ही मुलगी आश्चर्यचकीत झाली. त्यानंतर आई मुलीला शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण आईला आपल्यासाठी स्वतःचे केस कापताना पाहून मुलीला अश्रू अनावर होतात. गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

आतापर्यंत या व्हिडीओला २३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि या व्हिडीओला मिळाले आहेत. तर १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट्स केले आहेत. लोकांनी या  दोघी मायलेकींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटिझन्सनी मुलीच्या कॅन्सरच्या लढ्यात आईमुळे मोटिवेशन्स मिळाल्याचे म्हटले आहे. एका युजरनं कमेंट दिली आहे की असे लहान लहान प्रसंग माणसाला हिंमत देण्यासाठी महत्वाचे ठरतात. बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

Web Title: When mother blamed herself for her cancer patient daughter video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.