Viral Video : two guys floating on a bed in flooded Mumbai rains | Viral Video : नादखुळा... पाण्यातून वाट काढताना लोकांची हालत; 'ते' दोघं गेले स्टाईलमध्ये तरंगत!

Viral Video : नादखुळा... पाण्यातून वाट काढताना लोकांची हालत; 'ते' दोघं गेले स्टाईलमध्ये तरंगत!

मुंबई मुसळधार पाऊसस सुरू असल्याचे तुम्हाला माहीत आहेच. सोशल मीडियावर अनेक धडकी भरवणारे व्हिडीओ आणि फोटो तुम्ही पाहिले असतीलच. रस्त्यांना नदीचं रूप मिळालं आहे. असं म्हणुया की, समुद्र लोकांच्या घरात घुसलाय. बचावकार्य जोरात सुरू आहे. हे सगळं सुरू असताना एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. पण हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @realshailimore ने ६ ऑगस्टला शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुंबई स्टाइल में - तू चिल्ल मार, टेंशन ना ले'. हा व्हिडीओ लोकांच्या फार पसंतीस पडत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि साडे तीन हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

यात तुम्ही बघू शकता की, मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दोन तरूण याच पाण्यात एक गादीसारख्या एका वस्तूवर झोपून पाण्याचा आनंद घेत आहेत. यांचा हा तरंगतानाा मजेदार व्हिडीओ पाहून लोकांनाही त्यांचंसारखं करण्याची इच्छा होत आहे. काहींनी कमेंट केल्या की, असं टेंशन फ्री लाइफ हवं.

हे पण बघा :

Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण

Video: मुंबईच्या वादळी वाऱ्यातील जबरदस्त व्हिडीओ; आनंद महिंद्रांनी ट्विट करत विचारला प्रश्न

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral Video : two guys floating on a bed in flooded Mumbai rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.