VIDEO : कारमधून जात होतं कपल, अचानक समोरच्या काचावर आला खतरनाक साप आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:11 PM2021-10-02T18:11:51+5:302021-10-02T18:13:41+5:30

कारमध्ये बसलेलं कपल तेव्हा इतकं घाबरलं जेव्हा त्यांनी हायवेवर त्यांच्या कारच्या विंडस्क्रीनवर एका सापाला सवारी करताना पाहिलं.

Viral Video : Snake hitches ride on car windscreen watch video | VIDEO : कारमधून जात होतं कपल, अचानक समोरच्या काचावर आला खतरनाक साप आणि मग....

VIDEO : कारमधून जात होतं कपल, अचानक समोरच्या काचावर आला खतरनाक साप आणि मग....

googlenewsNext

कधी कधी कारने प्रवास करताना अशा काही घटना घडतात की, हैराण व्हायला होतं. आता हेच बघा ना कारमध्ये बसलेलं कपल तेव्हा इतकं घाबरलं जेव्हा त्यांनी हायवेवर त्यांच्या कारच्या विंडस्क्रीनवर एका सापाला सवारी करताना पाहिलं. ते इतके घाबरले होते की, त्यांची हालत खराब झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण ही घटना कुठली आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

कारच्या आतून रेकॉर्ड केलेला सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बघू शकता की, एक मोठा साप कारच्या वेगात असल्याने कारच्या विंडस्क्रीनवर घसरताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातील साप कारच्या बोनटवर सरपटताना दिसत आहे. आणि जसा कारचा स्पीड वाढतो तो घसरत विंडस्क्रीनवर पोहोचतो.

साप काचेवर घसरत बिल्कुल ड्रायव्हरच्या जवळ येतो. सापाच्या विंडस्क्रीनवर आल्यावर ड्रायव्हरने कार थांबण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओत दिसतं की, सापाला इतक्या जवळ पाहून कारमधील कपल फारच घाबरलेलं आहे. त्यानंतर साप बोनटवरून विंडस्क्रीनवर आणि नंतर साइड विंडोजवळ येतो. तिथे तो अडकतो. २१ सेकंदाच्या या व्हिडीओला यूट्यूबवर काही हजार व्ह्यूज मिळाले आहेत.
 

Web Title: Viral Video : Snake hitches ride on car windscreen watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.