VIDEO : फॅनखाली आरामात गप्पा मारत बसले होते लोक, पण अचानक घडली श्वास रोखून ठेवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:34 PM2022-01-18T18:34:47+5:302022-01-18T18:49:57+5:30

Funny Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही लोक फॅनखाली हवा घेत गप्पा मारत बसलेले असतात. पण अचानक असं काही होतं की, काही क्षणांसाठी त्यांचा श्वास रोखला जातो.

Viral Video : People were sitting comfortably under the fan, see what happen next | VIDEO : फॅनखाली आरामात गप्पा मारत बसले होते लोक, पण अचानक घडली श्वास रोखून ठेवणारी घटना

VIDEO : फॅनखाली आरामात गप्पा मारत बसले होते लोक, पण अचानक घडली श्वास रोखून ठेवणारी घटना

googlenewsNext

Funny Viral Video : कधी कधी असं काही अघटीत घडतं, ज्याची कल्पनाही केलेली नसते. ज्या फॅनखाली बसून लोक आरामात हवा खात बसतात तोच फॅन जीवावर बेतू शकतो याचा कुणी विचार केला नसेल. अशीच एक घटना लाइव कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने खाली बसलेले लोक वाचले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही लोक फॅनखाली हवा घेत गप्पा मारत बसलेले असतात. पण अचानक असं काही होतं की, काही क्षणांसाठी त्यांचा श्वास रोखला जातो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, काही लोक एका छोट्याशा रूममध्ये आरामात बसून गप्पा मारत असतात. काही सेकंदात एक मोठी दुर्घटना घडते. दोन व्यक्ती जमिनीवर झोपलेले होते तर एक बसलेला होता. ते गप्पा मारत होते, तेव्हाच अचानक फॅन तुटून खाली पडला. हा फॅन रूमच्या मधोमध पडला. सुदैवाने फॅनखाली कुणी नव्हतं. कुणाला काही इजा झाली नाही. पण काही क्षणांसाठी त्यांचा श्वास नक्कीच रोखला गेला असेल.

इन्स्टाग्रामवर हा व्हिीओ अपलोड करण्यात आला असून काही तासांमध्ये या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ८० हजार लाइक्स मिळाले आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त या व्ह्यू या व्हिडीओला मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

हे पण वाचा : 

आजोबा स्वत:ला श्री रामाचे वंशज समजायचे आणि त्याच्या नातवाने पाकिस्तानही मागणी केली!
 

Web Title: Viral Video : People were sitting comfortably under the fan, see what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.