बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By manali.bagul | Published: November 6, 2020 05:58 PM2020-11-06T17:58:32+5:302020-11-06T18:06:05+5:30

Viral Video in Marathi : काही जुगाडूंनी भन्नाट आयडिया लावून या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे. फटाक्यांच्या जुगाडाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

viral video man bursting baloons with fire after many states banned firecrackers in diwali | बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Next

कोरोनाच्या माहामारीत सगळेच सण उत्सव  शांततेत साजरे करण्याचे आवाहन केलं जात आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता फटाक्याच्या वापरावरही शासनाद्वारे बंदी घातण्यात आली आहे. भारतात राजस्थान, दिल्ली, ओडिशा, सिक्किम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये फटाके बॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करताना आता फटाके फोडता येणार नाहीत.  नियमांचे उल्लंघन करून जे लोक फटाके फोडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

आता  काही जुगाडूंनी भन्नाट आयडिया लावून या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे. फटाक्यांच्या जुगाडाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एका माणसानं फुग्यांचा ढीग तयार करून खालच्या बाजूला जाळ तयार केरून फुग्यांवर आग पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे. आगीच्या संपर्कात फुगे आल्यानंतर मोठा आवाज होऊन  हे फुगे फूटत आहेत. फेसबूकवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. एका युजरने कमेंट्स करत म्हटले आहे की, फटाके बॅन झाल्याने नवीन अविष्कार केला आहे.

 जबरदस्त! भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो

राजधानी दिल्लीमध्येही फटाके न फोडता दिवाळी साजरी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी तसंच नंतरही फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. दिवाळीच्या  दिवशी फक्त ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची सवलत दिली आहे. त्यातही कमी प्रदूषण करणारे आणि ग्रीन फटाके लावण्यास परवानगी दिली आहे. बाबो! 'अँटीव्हायरस टिफिन' खाण्यासाठी लोक करताहेत गर्दी, वाचा 'या' भन्नाट हॉटेलची खासियत

Web Title: viral video man bursting baloons with fire after many states banned firecrackers in diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.