Video : लहानग्या अस्वलाला बघण्यासाठी कमी केला कारचा स्पीड, आईचं 'हे' रूप पाहून ड्रायव्हर असा काही पळाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:02 PM2020-06-16T12:02:50+5:302020-06-16T12:04:18+5:30

कारमधील काही लोक त्यांना बघण्यासाठी गाडीचा वेग कमी करतात. अस्वलाची पिल्लं यामुळे घाबरतात, मग काय त्यांची आई कारवर हल्ला करण्यासाठी धावत सुटते.

Viral Video : Mama bear try to attack car to protect cubs in Montana | Video : लहानग्या अस्वलाला बघण्यासाठी कमी केला कारचा स्पीड, आईचं 'हे' रूप पाहून ड्रायव्हर असा काही पळाला....

Video : लहानग्या अस्वलाला बघण्यासाठी कमी केला कारचा स्पीड, आईचं 'हे' रूप पाहून ड्रायव्हर असा काही पळाला....

Next

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून हे पुन्हा बघायला मिळतं की, आपण प्राण्यांपासून दूर का रहावं. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एका यूजरने शेअर केलाय. यात तुम्ही बघू शकता की, एक अस्वल तिच्या तिन पिल्लांना जंगलाकडे नेत आहे. अशात कारमधील काही लोक त्यांना बघण्यासाठी गाडीचा वेग कमी करतात. अस्वलाची पिल्लं यामुळे घाबरतात, मग काय त्यांची आई कारवर हल्ला करण्यासाठी धावत सुटते.

इन्स्टाग्राम यूजरने breezefax ने हा व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वी शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला 52 हजारपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'अमेरिकेतील मोंटानामध्ये काही अस्वलांना बघण्यासाठी कारने जाणारे लोक स्पीड कमी करतात. त्यांनी काहीही केलं नाही, पण पिल्लं घाबरली म्हणून आईने कारवर हल्ला केला. चुकूनही अस्वलांच्या आईसोबत पंगा घेऊ नका'.

व्हिडीओत बघू शकता की, रस्त्याच्या कडेला अस्वल आणि तिचे तीन पिल्लं जंगलाकडे जात असतात. पण एका पिल्लू मागेच राहतं. ते स्पीड झालेल्या कार बघून घाबरतं आणि पळू लागतं. हे बघून त्याच्या आईला राग नाही येणार तर नवल. मादा अस्वल काही होऊ नये म्हणून त्या कारमागे वेगाने धावू लागते आणि कारचा ड्रायव्हर गाडी तिथून सुसाट पळवतो.

Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

Viral Video : 'अशी' खतरनाक असते भौ बिबट्याची स्टाईल, व्हिडीओ एकदा बघाल बघतच रहाल....

Web Title: Viral Video : Mama bear try to attack car to protect cubs in Montana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.