Viral Video : समुद्रात आराम करत असलेल्या सर्फरकडे वेगाने जात होता शार्क आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 02:17 PM2019-09-20T14:17:54+5:302019-09-20T14:22:44+5:30

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या वेरी बीचवर एक सर्फर पाण्यात आराम करत होता. तेच दुसरीकडून त्याच्या दिशेने एक शार्क वेगाने येत होती.

Viral Video: Drone pilot saves surfer from shark using speakers | Viral Video : समुद्रात आराम करत असलेल्या सर्फरकडे वेगाने जात होता शार्क आणि...

Viral Video : समुद्रात आराम करत असलेल्या सर्फरकडे वेगाने जात होता शार्क आणि...

Next

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या वेरी बीचवर एक सर्फर पाण्यात आराम करत होता. तेच दुसरीकडून त्याच्या दिशेने एक शार्क वेगाने येत होता. मात्र, त्याला याची अजिबातच कल्पना नव्हती. अशात ड्रोन कॅमेरा या सर्फरसाठी देवदूत बनून आला. या ड्रोन कॅमेराने सर्फरला शार्कबाबत सांगितले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. 

ही घटना १५ सप्टेंबर रविवारची आहे. ऑस्ट्रेलिया फायनॅन्शिअल रिव्ह्यूचे पत्रकार क्रिस्टोफर जॉय रविवारी वेरी बीचवर त्यांच्या ड्रोनच्या मदतीने शार्कचा शोध घेत होते. अचानक त्यांना दिसलं की, एक विशाल शार्क एका सर्फरच्या दिशेने वेगाने जात आहे. सर्फरला याची काहीच कल्पना नव्हती.

क्रिस्टोफरने यांनी सांगितले की, जेव्हा शार्कला सर्फरकडे जाताना पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच ड्रोनला लावलेल्या स्पीकरच्या मदतीने त्या सर्फरला शार्कबाबत माहिती दिली. आराम करत असलेला सर्फर लगेच सतर्क झाला आणि किनाऱ्याकडे जाऊ लागला. दरम्यान शार्कने सुद्धा इतक्यात दिशा बदलली होती. शार्क समुद्राकडे जाऊ लागला.

क्रिस्टोफरच्या समजूतदारपणामुळे मोठी दुर्घटना टळली. क्रिस्ट्रोफर यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हा व्हिडीओ २२ हजार लोकांनी पाहिला. तर अनेकजण क्रिस्टोफर यांचं कौतुकही करत आहेत. 

Web Title: Viral Video: Drone pilot saves surfer from shark using speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.