VIDEO : कुत्र्याला मास्क लावून खांद्यावर बसवलं, म्हणाला 'स्वत: मरेन, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 03:04 PM2021-04-16T15:04:44+5:302021-04-16T15:15:09+5:30

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका गरीब व्यक्तीने एका कुत्र्या त्याच्या खांद्यावर बसवला आहे. आणि त्याच्या तोंडावर मास्क लावलाय.

Viral video of dog wearing a mask man took the dog on his shoulder | VIDEO : कुत्र्याला मास्क लावून खांद्यावर बसवलं, म्हणाला 'स्वत: मरेन, पण...'

VIDEO : कुत्र्याला मास्क लावून खांद्यावर बसवलं, म्हणाला 'स्वत: मरेन, पण...'

googlenewsNext

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण बघता लोक आपल्यासोबत आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेत आहेत. जेव्हा तुमच्याकडे पाळीव प्राणी असतात तेव्हा त्यांची सुरक्षाही तुमची जबाबदारी असते. जास्तीत जास्त लोक कुत्रे पाळतात. कुत्र्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते माणसांना जास्त आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती त्याच्या खांद्यावर बसलेल्या कुत्र्या मास्क लावून नेत आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे लोक स्वत:सोबतच इतरांचीही काळजी घेत आहेत. इतकेच नाही तर लोक आपल्या प्राण्यांनाही महामारीपासून वाचवण्यासाठी काहीना काही प्रयत्न करत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका गरीब व्यक्तीने एका कुत्र्या त्याच्या खांद्यावर बसवला आहे. आणि त्याच्या तोंडावर मास्क लावलाय. अशात एका व्यक्तीने या गरीब व्यक्तीला नाव विचारलं आणि कुत्र्याला खांद्यावर बसवून का नेताय हेही विचारलं.  (हे पण बघा : आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ; म्हणाले, 'लॉकडाऊननंतर असाच इन्जॉय करणार'......)

खांद्यावर कुत्रा घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला विचारलं की, तुमचं नाव काय? तर त्यांनी सांगितलं मोहन लाल देवांगन, नंतर त्यांना कुत्र्याचं नाव विचारलं तर त्यांनी सांगितलं पुरू. इतकेच नाही तर त्यांना विचारलं की, तुम्ही स्वत: मास्क न लावता कुत्र्याला का मास्क लावलाय? तर यावर ते म्हणाले की, 'मी मरेन, पण याला नाही मरू देणार. माझं लेकरू आहे. बालपणापासून सांभाळलं आहे'.
 

Web Title: Viral video of dog wearing a mask man took the dog on his shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.