VIDEO : वाघाचं बछडं घेऊन पळालं माकड, व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:23 PM2020-02-05T14:23:45+5:302020-02-05T14:36:57+5:30

सोशल मीडियावर वाघ आणि त्यांच्या बछड्यांचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनाला आनंद देणारे असतात तर कधी मन हळवं करणारे असतात.

Viral Video : Baboon Adopts and Grooms Lion Cub | VIDEO : वाघाचं बछडं घेऊन पळालं माकड, व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघा पुढे काय झालं....

VIDEO : वाघाचं बछडं घेऊन पळालं माकड, व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघा पुढे काय झालं....

Next

सोशल मीडियावर वाघ आणि त्यांच्या बछड्यांचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनाला आनंद देणारे असतात तर कधी मन हळवं करणारे असतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो बघून तुम्हाला आनंद आणि आश्चर्य वाटेल. तसे वाघाला बघून सगळी जनावरे पळायला लागतात. पण एका मोठ्या माकडाने वाघाचं बछडंच उचलून नेलं.

हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेच्या जंगलातील असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. माकडाने वाघाचं बछडं उचललं आणि झाडावर चढलं. झाडावर ते जोरजोरात इकडे तिकडे उड्या मारू लागलं. हा व्हिडीओ क्रूगर सायटिंग्स नावाच्या यूट्यूब पेजवर शेअर करण्यात आला असून लोकांना फारच आवडला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे. १ फ्रेबुवारी २०२० ला हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. कर्ट शुल्त्स यांनी हा व्हिडीओ काढला असून ते मीटिंगला जात होते. दरम्यान त्यांना एक माकड वाघाचं बछडं उचलून नेताना दिसलं आणि त्यांनी हा दोघांना कॅमेरात कैद केलं. हा व्हिडीओ पाहून लोक त्यावर अनेक कमेंट करत आहेत. एका व्यक्तीला तर 'द लायन किंग' सिनेमातील सीनही आठवला. त्यात एका माकड सिम्बाला उचलतं आणि सर्वांना दाखवतं.

दरम्यान, या नॅशनल पार्कमधून आणखी एका धक्कादायक घटना समोर आली होती. इथे शिकार करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला वाघांनी फाडून खाल्लं होतं. शिकारी शिकार करण्यासाठी रायफल घेऊन आला होता. पण त्याची ही रायफल त्याच्या काहीच कामी पडली नाही. त्याच्या मृतदेहाच्या बाजूलाच ही रायफल पडलेली सापडली. पोलिसांनी सांगितले होते की, शिकारीच्या शरीराचा फारच कमी भाग शिल्लक राहिला होता.


Web Title: Viral Video : Baboon Adopts and Grooms Lion Cub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.