सलाम! कोरोनाकाळात पैसै नाहीत त्यांना मोफत बिर्याणी पुरवून गरिबाची भूक भागवतेय 'ती' अन्नदाता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:13 PM2021-04-17T16:13:08+5:302021-04-17T16:22:16+5:30

Viral News : बिर्याणीच्या गाडीवर गोरगरिब आणि ज्यांच्याकडे सध्या पैसे नाहीत अशा लोकांना मोफत बिर्याणी वाटली जात आहे.

Viral News : social news coimbatore free biriyani for people who cant pay | सलाम! कोरोनाकाळात पैसै नाहीत त्यांना मोफत बिर्याणी पुरवून गरिबाची भूक भागवतेय 'ती' अन्नदाता

सलाम! कोरोनाकाळात पैसै नाहीत त्यांना मोफत बिर्याणी पुरवून गरिबाची भूक भागवतेय 'ती' अन्नदाता

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या मनात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. जर खायला आणि कमवायला काही शिल्लक नसेल तर लोकांनी करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा  ताणतणावपूर्ण वातावरण काही लोक असेही आहेत. जे समाजातील गरजू लोकांसाठी राबताना दिसून येत आहेत.  तामिळनाडूतील एका बिर्याणीच्या गाडीवर गोरगरिब आणि ज्यांच्याकडे सध्या पैसे नाहीत अशा लोकांना मोफत बिर्याणी वाटली जात आहे.

रेडिओ जॉकी आणि एक्टर आरजे बालाजी यानं ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी  या बिर्यानीच्या गाडीचे फोटो ट्विट करत कॅप्शन दिलं आहे की, पूलिकूलामध्ये छोटसं रोड साईट बिर्यानी शॉप आहे. त्यांची माणूसकी खूप उत्तम असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार हे स्टॉल एक महिला चालवते.

त्यांनी आपल्या स्टॉलच्या बाहेर लिहिलं आहे की, मोफत जेवण मिळणार. त्यांनी या ठिकाणी एक बोर्ड लावला आहे. या बोर्डवर लिहिलं आहे की, तुम्ही उपाशी असाल तर इथे प्रेमाचं जेवण तुम्हाला मिळेल. आतापर्यंत या फोटोला  २४ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १६० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

Viral news in Marathi : Delhi restaurant is giving food in 10 rupees to poor | लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच एका फूड स्टॉलची चर्चा  होती. राजधानी दिल्लीमध्ये एक माणूस केवळ १० रुपयात लोकांना जेवण पुरवत आहे. सध्याच्या काळात  १० रूपयात चहा मिळणंसुद्धा कठीण आहे. असं असूनही हा माणूस अन्नदाता बनून गरजू लोकांना केवळ १० रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. हे भोजनालय दिल्लीतील बाबरपूर मेट्रो स्थानकाजवळ आहे. किरण वर्मा यांनी हे भोजनालय सुरू केलं असून नेहमीच सामाजीक कार्यात आपला हातभार लावत असतात. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा....

हे भोजनालय सुरू करण्याच्यावेळी बेरोजगारांना मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला होता.  जवळपास १० लोक यांच्या या दुकानात काम करतात. लॉकडाऊनमध्ये  ज्यांची नोकरी गेली त्यांना या ठिकाणी काम देण्यात आलं आहे. किरण यांच्या दुकानाचं भाडं ६० हजार रूपये इतकं आहे. या भोजनालयात गरिब लोकांना डाळ, भाजी, भात, पूरी, हलवा असं पूर्ण जेवण मिळतं.  दर आठवड्याचा मेन्यू वेगवेगळा असतो. 

Web Title: Viral News : social news coimbatore free biriyani for people who cant pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.