याला म्हणतात नशिब ! Amazon वरून मागवला माऊथवॉश; अन् बॉक्समध्ये निघाला Redmi Note 10 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:16 PM2021-05-14T16:16:22+5:302021-05-14T16:24:34+5:30

Viral amazon received redmi note 10 : जेव्हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा त्यानं मॉऊथ वॉश ऐवजी रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन या तरूणाला दिला.

Viral : Mumbai based man odered mouthwash from amazon received redmi note 10 | याला म्हणतात नशिब ! Amazon वरून मागवला माऊथवॉश; अन् बॉक्समध्ये निघाला Redmi Note 10 

याला म्हणतात नशिब ! Amazon वरून मागवला माऊथवॉश; अन् बॉक्समध्ये निघाला Redmi Note 10 

googlenewsNext

मुंबईतील रहिवासी असलेल्या एका मुलासह असं काही घडलं आहे. ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या व्यक्तीनं अॅमेझॉनवरून माऊथवॉश ऑर्डर केला होता. तुमचा विश्वास बसणार नाही पण जेव्हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा त्यानं मॉऊथ वॉश ऐवजी रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन या तरूणाला दिला. ट्विटरवर  लोकेश डागा (Lokesh Daga)  नावाच्या मुलानं ई-कॉमर्स आणि स्मार्टफोनच्या दोन मोठ्या कंपन्यांना टॅग केलं आहे. 

पोस्टमध्ये म्हटले आहे की, '' 10 मे रोजी त्यांनी कोलगेट माऊथवॉशची बाटली 396 रुपयांना मागिवली. पण जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा त्यांना रेडमी नोट 10 मिळाला, ज्याची किंमत 13 हजार रुपये आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, 'नमस्कार अॅमेझॉन, मी ऑर्डर # 406-9391383-4717957 द्वारे कोलगेट माऊथ वॉश मागवला होता. पण त्याऐवजी @ रेडमी नोट 10 मिळाला.  माऊथवॉश परत मिळवण्याचा पर्याय असल्यास मी प्रयत्न करेन.

ट्विटमध्ये डागाने असेही म्हटले आहे की पॅकिंगचे लेबल तेच असले तरी सामान दुसर्‍याचे होते. तो म्हणाला, 'ही वस्तू तुम्हाला योग्य व्यक्तीकडे घेऊन जाण्यासाठी मी ईमेल देखील केला आहे. ' ऑनलाईन शॉपिंगदरम्यान अनेक अशा घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी एका मुलानं सफरचंद ऑर्डर केल्यानंतर त्याला ऑनलाईन अॅपल आयफोन मिळाला होता. त्यानंतर हा मार्केटिंगचा भाग असल्याचं  वृत्त समोर आले होते. 

Read in English

Web Title: Viral : Mumbai based man odered mouthwash from amazon received redmi note 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.