Pushpa Style Celebration, Viral Video: रूकेगा नहीं साला... पुष्पा फिव्हर अजूनही सुरूच! आता महिला क्रिकेटपटूंमध्ये क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 08:17 PM2022-05-10T20:17:11+5:302022-05-10T20:19:01+5:30

पुष्पाची क्रेझ थांबण्याचं नावंच घेत नाहीये...

Video of Nepal Bowler Does Pushpa Style Celebration as ICC Says It has Gone So Far On Social Media watch Viral Video | Pushpa Style Celebration, Viral Video: रूकेगा नहीं साला... पुष्पा फिव्हर अजूनही सुरूच! आता महिला क्रिकेटपटूंमध्ये क्रेझ

Pushpa Style Celebration, Viral Video: रूकेगा नहीं साला... पुष्पा फिव्हर अजूनही सुरूच! आता महिला क्रिकेटपटूंमध्ये क्रेझ

Next

Pushpa Style Celebration, Viral Video: अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट सर्वत्र हिट झाला. या चित्रपटातील 'झुकेगा नहीं साला' हा डायलॉग आणि त्यावर अल्लू अर्जुनने केलेली स्टाईल चांगलीच सुपरहिट ठरली. IPL 2022 मध्ये रवींद्र जाडेजा आणि ओबेद मॅकॉय यांनी पुष्पा स्टाईल सेलिब्रेशनचा ट्रेंड सेट केल्यानंतर आता महिला क्रिकेटपटूंमध्येही हा ट्रेंड दिसून आला.

दुबईतील फेअरब्रेक इनव्हिटेशनल टूर्नामेंटमध्ये एका महिला खेळाडूने 'पुष्पा' स्टाईल सेलिब्रेशन केल्याचे दिसले. ५ मे रोजी टॉर्नेडोज वुमन आणि सॅफायर्स वुमन यांच्यातील सामन्यात, नेपाळची सीता राणा मगर हिने सुपरहिट चित्रपट 'पुष्पा' मधील अल्लू अर्जुनच्या शैलीची नक्कल करत विकेट घेऊन सेलिब्रेशन केले. "हे सोशल मीडियावर खूप दूरवर पोहोचले आहे. नेपाळची सीता राणा मगर हिने सध्या सर्वात लोकप्रिय असलेली स्टाईल मारत सेलिब्रेशन केलं", अशा कॅप्शनसह ICC ने व्हिडीओ पोस्ट केला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, पुष्पा चित्रपटातील अनेक गाणीही खूप लोकप्रिय झाली. त्यावर मोठ्या प्रमाणावर इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यात आले आणि ते व्हायरलही झाले. या चित्रपटाने विविध भाषांमध्ये चित्रपट रिलीज केल्यामुळे त्याची व्याप्ती वाढली आणि त्याचा चांगला परिणामदेखील दिसून आला. 

Web Title: Video of Nepal Bowler Does Pushpa Style Celebration as ICC Says It has Gone So Far On Social Media watch Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.