VIDEO : अजगराच्या अंड्याला स्पर्श करण्याचा करत होता प्रयत्न, मग झालं ते बघून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:30 PM2021-11-26T18:30:57+5:302021-11-26T18:33:26+5:30

Social Viral : आज आईची क्षमता दाखवणारा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल की, आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते.

Video : Man was trying to touch pythons eggs then see how the giant attacked | VIDEO : अजगराच्या अंड्याला स्पर्श करण्याचा करत होता प्रयत्न, मग झालं ते बघून उडेल थरकाप

VIDEO : अजगराच्या अंड्याला स्पर्श करण्याचा करत होता प्रयत्न, मग झालं ते बघून उडेल थरकाप

Next

सोशल मीडियावर आपल्या असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात, ज्यांमध्ये आईची शक्ती आपल्याला दिसून येते. मनुष्यांची आई असो वा प्राण्यांची आई आई असते. आपल्या बाळांसाठी ती कुणासोबतही लढू शकते. आई आपल्या बाळांना जन्म देते आणि त्यांना सगळं शिकवते. तसेच ती सर्वप्रकारे आपल्या बाळांची सुरक्षा करते.

आज आईची क्षमता दाखवणारा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल की, आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. या व्हिडीओत एक मादा अजगर आहे. विशाल मादा अजगर व्हिडीओ आपल्या अंड्यांची सुरक्षा करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ jayprehistoricpets नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबतच व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, आई आपल्या अंड्यांची सुरक्षा करू शकते'. आपल्या अंड्यांची सुरक्षा करत असलेल्या या मादा अजगराचा हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५४ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

हा व्हिडीओ पाहून लोक मादा अजगराच्या ममतेला सलाम करत आहेत. तुम्ही बघू शकता की मादा अजगर एका छोट्या बॉक्स बसला आहे. त्यात अनेक अंडी आहेत. ज्यात तिचे पिल्लं वाढत आहेत. मादा अजगर आपल्या पिल्लांचा रक्षा करताना दिसत आहे. एक व्यक्ती अंड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. पण अजगर त्याच्यावर हल्ला करतो. 
 

Web Title: Video : Man was trying to touch pythons eggs then see how the giant attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.