Video: पाणी पित असलेल्या हरणावर सिंहाने केला हल्ला, मग जे झालं ते पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 06:07 PM2021-11-27T18:07:16+5:302021-11-27T18:12:43+5:30

Social Viral : व्हिडीओत बघू शकता की, हरणाच्या चपळ बुद्धीसमोर जंगलाचा राजाचा स्पीड निकामी ठरला. हरणाचा जीव वाचला कारण त्याने बुद्धी लावली.

VIDEO : The lion attacked the deer drinking water then it will be fun to see what happened | Video: पाणी पित असलेल्या हरणावर सिंहाने केला हल्ला, मग जे झालं ते पाहून व्हाल थक्क

Video: पाणी पित असलेल्या हरणावर सिंहाने केला हल्ला, मग जे झालं ते पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

Social Viral : तल्लख बुद्धीसमोर ताकद नेहमीच सरेंडर होते. हे खरं ठरवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाला आहे. यात एका हरणाने आपल्या चतुराईने जंगलाच्या राजाला मात दिली आहे.  व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तलावात पाणी पित असलेल्या एका हरणावर अचानक सिंहाने हल्ला केला.

व्हिडीओत बघू शकता की, हरणाच्या चपळ बुद्धीसमोर जंगलाचा राजाचा स्पीड निकामी ठरला. हरणाचा जीव वाचला कारण त्याने बुद्धी लावली. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना फारच आवडला आहे. तुम्ही बघू शकता की, तलावातील पाणी हरण पित आहे, असं वाटतं जणू हरणाला माहीत होतं की, त्याच्यावर हल्ला होणार आहे.

हरण पाणी पिता पिता सतर्क होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की, हल्ला होणार आहे. तरीही त्याचं डोकं स्थिर आहे. हा व्हिडीओ रंबल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.

असं स्पष्टपणे जाणवतं की, हरणाच्या डोक्यात हेच चालू आहे की, कुणीतरी त्याच्यावर हल्ला करू शकतं. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा आजूबाजूला बघतं. तेव्हाच अचानक एक सिंह त्याच्याकडे वेगाने धावत येतो. पण हरण त्याच्या हातात सापडत नाही. हरण तेथून काही सेकंदात पसार होतं.
 

 

Web Title: VIDEO : The lion attacked the deer drinking water then it will be fun to see what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.