Video: 'भाइचारा ऑन टॉप', अमन आणि इम्रानची एकत्रच निघाली वरात, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 21:15 IST2025-12-02T21:15:09+5:302025-12-02T21:15:18+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: 'भाइचारा ऑन टॉप', अमन आणि इम्रानची एकत्रच निघाली वरात, व्हिडिओ व्हायरल...
Viral Video: देशात हिंदू-मुस्लिम ऐक्यावरुन अनेकदा वाद उद्भवतात. सोशल मीडियावरही द्वेषपूर्ण वक्तव्यांचे अनेक व्हिडिओ दिसतात. मात्र, या सर्वांमध्ये एक हृदयस्पर्शी व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, जे सांप्रदायिक एकतेचे सुंदर उदाहरण आहे. दोन वेगवेगळ्या धर्मांतील तरुणांनी आपल्या लग्नाच्या एक दिवस आधी पारंपरिक ‘बिंदोरी’ (वरात) एकत्र काढत समाजाला ऐक्याचा संदेश दिला.
अमन आणि इम्रानची एकत्र बिंदोरी; गावात आनंदाचे वातावरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अमन शर्मा आणि इम्रान अली नावाचे दोन युवक दिसत आहेत. दोघेही एक गाव आणि आणि एकाच परिसरातील आहेत. लग्नापूर्वीची बिंदोरी दोघांनी एकत्र घोड्यांवर बसून, बँड–बाजांच्या जल्लोषात काढली. त्यांच्या या निर्णयाने गावात आणि सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
घोड्यावरुन दोघांची मिरवणूक
व्हिडिओमध्ये दिसते की, दोन्ही नवरदेव वेगवेगळ्या घोड्यांवर बसले आहेत, पण मिरवणूक एकत्रच निघते. कुटुंबीय आणि मित्र एकत्र बँडबाजांच्या तालावर नाचत पुढे जात आहेत. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोक एकत्र आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
या दृश्याने पुन्हा एकदा सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ sadik_snake_lover या इंस्टाग्राम हँडलवरुन शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हजारो युजर्सनी हा व्हिडिओ लाईक करत भावनिक प्रतिक्रिया दिल्या.