Video: beehive at a most unlikely place, video goes viral on social media | बाबो! मधमाश्यांनी तरूणाच्या पृष्ठभागावरच बनवलं घर, व्हिडीओ पाहून मारून घ्याल कपाळावर हात!
बाबो! मधमाश्यांनी तरूणाच्या पृष्ठभागावरच बनवलं घर, व्हिडीओ पाहून मारून घ्याल कपाळावर हात!

मधमाश्यांचं पोळं तुम्ही अनेकदा इमारतीच्या छतावर, खिडकीत किंवा एखाद्या झाडाच्या फांदीवर पाहिलं असेल. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्ती पृष्ठभागाला मधमाश्यांचं पोळं लागलेलं पाहिलं? नक्कीच पाहिलं नसेल. मात्र, आता तुम्हाला हे चित्र बघायला मिळणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात चक्क एका तरूणाच्या पृष्ठभागावर मधमाश्यांनी त्यांचं घर थाटलं आहे.

हा व्हिडीओ नागालॅंडचा असून सोशल मीडिया यूजर्स हा आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंटही लोक करत आहेत.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियातव्हायरल झाला असून ४० हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर ६०० वेळा रिट्वीट करण्यात आलाय. 

तसेच ३ हजारपेक्षा अधिक या व्हिडीओला लाइक्स मिळाले आहेत. पण हे असं झालं कसं? हा प्रश्न काही आपल्याला स्वस्थ बसू देणार नाहीये.

Web Title: Video: beehive at a most unlikely place, video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.