Video : वाघ रस्त्यावर चालत होता अन् त्याला पकडण्यासाठी मागून लोक आले, बघा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:42 PM2020-05-15T12:42:21+5:302020-05-15T12:44:24+5:30

वाघ जसाही मागे वळतो एक व्यक्ती लगेच त्याच्याकडे दोर फेकतो आणि त्यात वाघ अडकतो. त्यानंतर काय होतं हे काही या व्हिडीओत दाखवलं नाहीय.

Tiger running on street and people were going to capture him video goes viral api | Video : वाघ रस्त्यावर चालत होता अन् त्याला पकडण्यासाठी मागून लोक आले, बघा पुढे काय झालं....

Video : वाघ रस्त्यावर चालत होता अन् त्याला पकडण्यासाठी मागून लोक आले, बघा पुढे काय झालं....

googlenewsNext

कधी तुम्ही प्रत्यक्षात असा नजारा पाहिलाय का की, ज्यात एक वाघ रस्त्यावर फिरतो आहे आणि त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे लोक धावत आहेत? असा नजारा एखाद्या सिनेमातच बघायला मिळू शकतो. हो ना? पण अशाच एका सत्य घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

आइएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिले की, 'आजपर्यंत काउ बॉइज गाय आणि घोड्यांना अशाप्रकारे पकडताना दिसत होते. आता ते त्याचप्रकारे रस्त्यावर वाघ पकडताना दिसत आहेत'.

सुशांत यांनी हेही सांगितले की, हा व्हिडीओ मेक्सिकोतील आहे. या व्हिडीओत तीन लोक जे काउ बॉइज दिसत आहेत. त्यांनी तशी हॅटही घातली आहे. तसेच त्यांच्या हातात दोरही आहे. एक वाघ फूटपाथवर चालतोय आणि हे लोक त्याचा पाठलाग करत आहेत. 

वाघ जसाही मागे वळतो एक व्यक्ती लगेच त्याच्याकडे दोर फेकतो आणि त्यात वाघ अडकतो. त्यानंतर काय होतं हे काही या व्हिडीओत दाखवलं नाहीय. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.

एका व्यक्तीने सांगितले की, हे लोक मेक्सिकोतील कार्टेल ड्रग डीलर आहेत. ड्रग डीलर्सचे शौक फारच विचित्र असतात. वाघ पाळणे हाही त्यांचा एक शौकच आहे.

Web Title: Tiger running on street and people were going to capture him video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.