Social Viral:दिल्लीच्या गजबजलेल्या नाईट लाईफमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगोलपुरी भागातून एक धक्कादाय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दारूच्या नशेत असलेली एक तरुणी रॅपिडो बाईकवरून अक्षरशः कोसळताना दिसत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही त्या रॅपिडो चालकाने दाखवलेली माणुसकी आणि जबाबदारीची भावना ही अनेकांसाठी एक मोठा धडा ठरली आहे.
बाईकवर बसणेही झाले कठीण
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील मंगोलपुरी भागातील एका नाईट क्लबबाहेर घडली. उशिरा रात्री पार्टी करून बाहेर आलेली ही तरुणी इतकी नशेत होती की तिला बाईकवर व्यवस्थित बसताही येत नव्हते. ती वारंवार मागच्या सीटवरून खाली घसरत होती.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रॅपिडो चालक तिला सावरण्याचा आणि खाली पडू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. एका हाताने त्याने बाईक पकडली आहे, तर दुसऱ्या हाताने तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ती खाली पडू नये म्हणून तो बरेच प्रयत्न करत असताना, तिथे उपस्थित असलेला एक व्यक्ती त्याला 'भाऊ, तिला सोडून दे' असे म्हणताना ऐकू येत आहे.
चालकाने तरुणीला वाचवले
अखेरीस, ती तरुणी पूर्णपणे बाईकवरून खाली कोसळते. मात्र, त्या रॅपिडो चालकाच्या प्रसंगावधानामुळे ती रस्त्यावर आपटण्याऐवजी हळूच खाली पडते. नशेत असलेल्या अवस्थेत गंभीर दुखापत होण्यापासून या चालकाने तिला वाचवले. या व्हिडिओने पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या रात्रीच्या वेळी बाहेर असण्याच्या सुरक्षेबद्दलची भीती पुन्हा एकदा वाढवली आहे.
सोशल मीडियावर संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका बाजूला, रॅपिडो चालकाच्या नि:स्वार्थीपणाचे आणि माणुसकीचे जोरदार कौतुक होत आहे, तर दुसरीकडे, मजा करण्याच्या नावाखाली स्वतःची सुरक्षा विसरणाऱ्या तरुणीवर टीका केली जात आहे. "हा केवळ एका मुलीचा निष्काळजीपणा नाही, तर मजा-मस्तीच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या युवा पिढीच्या मानसिकतेचे दर्शन आहे. हा समाजासाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे," असं एका युजरने म्हटलं. तर आणखी एकाने "हे लोक आपल्या संस्कृतीला नाश करण्याच्या दिशेने नेत आहेत," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
Web Summary : A Rapido driver in Delhi saved a heavily intoxicated girl from falling off his bike, displaying remarkable humanity. The incident, captured in a viral video, sparked debate about safety and responsibility among young people enjoying nightlife. Users praised the driver and criticized the girl's carelessness.
Web Summary : दिल्ली में एक रैपिडो ड्राइवर ने नशे में धुत एक लड़की को बाइक से गिरने से बचाया, जो मानवता का एक अद्भुत उदाहरण है। वायरल वीडियो में कैद हुई इस घटना ने युवाओं के बीच सुरक्षा और जिम्मेदारी पर बहस छेड़ दी। यूजर्स ने ड्राइवर की प्रशंसा की और लड़की की लापरवाही की आलोचना की।