Thief-cop! viral video of Pakistani police who will try to catch police | चोर-पोलीस! पाकिस्तानचा हा Video पहाल तर, हसून हसून बेजार व्हाल...

चोर-पोलीस! पाकिस्तानचा हा Video पहाल तर, हसून हसून बेजार व्हाल...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे, तो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कुठला नसून आपला सख्खा शेजारी आणि पक्का वैरी पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानीपोलिसांनी पुन्हा एकदा लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. (Viral Video of Pakistan Police.)


या व्हिडीओमध्ये  तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानच्या कोणत्यातरी शहरात पोलिसवाले एका इमारतीच्य छतावर पतंग गोळा करत आहेत, तर त्यांच्या पाठीमागे असलेल्य़ा छोट्या भींतीआड सज्ज्यावर एक आरोपी लपून बसला आहे. 


हा व्हिडीओ पाहून असे वाटतेय की, पोलिस त्या लपलेल्या व्यक्तीलाच शोधत आहेत. तर शेजारील घरातील लोक चोर पोलिसांच्या लपाछपीचा व्हिडीओ काढत आहेत. तेवढ्यात एक पोलीस त्या आरोपीला फोन करतो. फोन येताच आरोपी फोनच बंद करून टाकतो. व्हिडीओ काढणारे काही लांबवर होते, ते त्या पोलिसांना सांगत होते मागे बघा, मागे बघा. आरोपी त्या घराच्या सज्ज्यावर झोपून राहतो आणि पोलिस त्याला शोधू शकत नाहीत. हा व्हिडीओ एकदम हास्यास्पद आहे. 


या व्हिडीओमध्ये एक मुलगा बोलताना ऐकायला येत आहे. तो म्हणतो, मारला जाणार, वाचणार नाही. यावर त्याची आई म्हणते मरणार नाही. व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी केवळ औपचारिकता करत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आरोपी पाकिस्तानी पोलिसांना चांगला ओळखून आहे. यामुळे तो आरामात झोपून पोलीस जातात का याची वाट पाहतोय.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोक पाकिस्तानी पोलिसांची खिल्ली उडवत आहेत. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने हा व्हिडीओ रावळपिंडीचा असल्याचे म्हटले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Thief-cop! viral video of Pakistani police who will try to catch police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.